अजयच्या ‘या’ चित्रपटासाठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई :वृत्तसंस्था – बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ ची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे. हा चित्रपट १५ मार्चला रिलीज होणार होता. परंतु त्याची तारीख बदलून १७मे करण्यात आली आहे.‘दे दे प्यार दे’च्या मेकर्सने खुद्द याची माहिती दिली.

अजयचा ‘दे दे प्यार दे’ आणि ‘टोटल धमाल’ हे दोन्ही चित्रपट क्लॅश होत होते. म्हणजे ‘दे दे प्यार दे’ रिलीज झाल्यानंतर लगेच वीस दिवसांनी ‘टोटल धमाल’ रिलीज झाला असता. एकाच स्टारचे दोन चित्रपट केवळ २०दिवसांच्या फरकाने रिलीज होणे, हे कमाईच्या दृष्टीने योग्य नव्हते. यामुळे मार्केटींग कॅम्पेनमध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या. ‘दे दे प्यार दे’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकणेचं योग्य समजले, असे चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार यांनी सांगितले.

अजयचा ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटातून अजय देवगण तब्बल ८ वर्षांनंतर रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट करताना दिसणार आहे. आठ वर्षांपूर्वी ‘दिल तो बच्चा है जी’ या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अजय दिसला होता.

अजय शिवाय या चित्रपटात रकुल प्रीत सिंग,तब्बू, जिम्मी शेरगील हे कलाकार दिसून येणार आहे. तसेच शाहरूख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लव रंजन व टी सीरिज निर्मित हा चित्रपट अकीव अलीने दिग्दर्शित केला आहे.