अजित पवारांचे व्यसनाधीनतेवर भाषण सुरु अन् समोर आला दारूडा

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असताना ते व्यसनाधीनतेवर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी घडल्या प्रकाराने अजित पवार यांनी डोक्यावर हात मारू घेतला. ते व्यसनाधीनतेवर बोलत असतानाच एक दारुडा त्यांच्या समोरून गेला. हे पाहून अजित पवार यांनी डोक्यावर हात मारून घेतला. ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही लोक सुधारायची नाहीत असे म्हणत अजित पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.

काल इंदापूर तालुक्यातील काझड या गावात अजित पवार सायंकाळी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांना एक निवेदन आले होते. त्या निवेदनात अवैध पद्धतीने होणारी दारूबंदी बंद व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर पवार यांनी या गावात दारू विकली जाते हे वाईट असून व्यसनाधीन होऊ नका असा सल्ला दिला. यावेळी बोलताना हा हास्यास्पद प्रकार समोर आला.

अजित पवार उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांचे भाषण सुरु असताना एक दारूडा अचानक तेथे आला आणि डुलत डुलत चक्क मंचासमोरून निघाल्याचे दृश्य दिसले. हे पाहून पवार चकित झाले. कारण यावेळी व्यसनाधीन होऊ नका असे ते सांगत होते. यासाठी त्यांनी स्वर्गीय आर आर पाटील यांचे उदाहरण दिले होते. मात्र एवढेच सांगून देखील त्यांच्यासमोर तेही भाषणादरम्यान आलेल्या या तळीरामाला बघत पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.

त्या डुलत जाणाऱ्या तळीरामाला पाहून अजित पवार म्हणाले की, “‘हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करून देखील माझ्यासमोरच हा डुलत डुलत आलाय. आता काय करायचं, कधी कधी वाटतं ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही ही लोकं सुधारायची नाहीत.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.