रणबीरच्या बहीणीने रणबीर-आलियाला दिले ‘हे’ खास गिफ्ट

मुंबई : वृत्तसंस्था – आलीय भट आणि रणबीर कपूर यांचे नाते हे काही आता कोणा पासून लपून राहिले नाही. नुकतेच आलियाने रणबीरच्या फॅमिली सोबत न्यू ईयर पार्टीचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाउंट वरून शेअर केले होते. आता एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की रणबीरची बहिण रिधिमा हिने न्यू ईअरचे स्पेशल गिफ्ट म्हणून आलियाला आणि रणबीरला एक सोन्याची अंगठी दिली आहे. या अंगठीवर AR असे लिहिले आहे. या आधीही रिधिमाने आलियाला ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिले होते.

या वर्षी आलिया आणि रणबीर लग्न करणार असे मानले जात आहे. एका मुलाखतीत महेश भट यांनी असे संकेतही दिले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्टहे आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले होते. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे. आता फक्त हे दोघे आपल्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करतात, हे फक्त बघायचेय.

सध्या आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ शूटिंगमध्ये बिझी आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतोय. पुढच्या महिन्यात आलियाचा रणवीर सिंग सोबतचा ‘गली बॉय’ सिनेमा रिलीज होणार आहे. तसेच आलिया करण जोहरच्या मल्टीस्टारर ‘कलंक’ सिनेमात सुद्धा दिसणार आहे.