…म्हणून आलिया नाईट सूटमध्येच विमानतळावर

मुंबई : वृत्तसंस्था – आपण घराबाहेर पडताना चांगल्या कपड्यात बाहेर पडत असतो. परंतु जर आपण घरी असू तर अनेकदा नाईट ड्रेसवर असतो. अनेकदा आपण बाहेर जाताना हेच नाईट ड्रेस न बदलताच घराबाहेर पडतो. कपडे बदलण्याचा आपण कंटाळा करतो. परंतु आता सेलिब्रिटीही या सवयीला अपवाद नसल्याचे आलिया भट्टने दाखवून दिले आहे. आलिया चक्क नाईट सूटमध्येच विमानतळावर पोहोचली. तिला अशा पोषाखात पाहून अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या.

मुंबईतून हैद्राबादला जाणार्‍या विमानात बसण्यासाठी आलिया विमानतळावर दाखल झाली होती. रात्रीचा प्रवास असल्याने ती नाईट सूटमध्येच विमानतळावर आली असावी. कारण रात्री उशिराच्या फ्लाईटसाठी सजूनधजून बाहेर पडणे ( विमानात जाऊन डुलक्या घेणे ) हे खरे तर वैताग आणणारेच असते. मुख्य म्हणजे तिला दुसरीकडे कुठे देशाबाहेरही जायचे नव्हते.

तिच्या या फोटोवर भन्‍नाट कॉमेंट्स

हैद्राबादला तिच्या ‘कलंक’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग आहे. त्यासाठी जात असताना ती या फ्लोरल प्रिंट नाईट सूटमध्येच आली. अर्थात हा नाईट सूट जरी असला तरी तो आलिया भट्ट नामक एका सेलिब्रिटीने परिधान केलेला होता व त्याची किंमत होती 1.78 लाख रुपये (फक्‍त!) इतक्या महागाचा नाईट सूट असल्याने ती गबाळ्यासारखी अर्थातच दिसत नव्हती तर एखाद्या जपानी बाहुलीसारखीच दिसत होती ती गोष्ट वेगळी! मात्र पापाराझींनी तिचा या अवतारातीलही फोटो टिपून तो सर्वत्र प्रसिद्ध केलाच. तिच्या या फोटोवर अनेकांनी सोशल मीडियात भन्‍नाट कॉमेंट्सही केल्या.