अबब… इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्न पत्रिकेचा खर्च इतका….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश आंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यांच्या लग्न पत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. या लग्न पत्रिकेची किंमत लाखोंच्या घरात आहे. ही लग्नपत्रिका प्रत्येकी ३ लाखांची आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नपत्रिकांपैकी ही एक पत्रिका मानली जात आहे.

अशी आहे लग्नपत्रिका

अतिशय सुंदर अशी ही लग्नपत्रिका पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या बॉक्स मध्ये ठेवली आहे.

 या बॉक्सच्या बाहेर ‘इन्व्हिटेशन बाय नीता अँड मुकेश अंबानी तसेच स्वाती अँड अजय पिरामल ‘असे लिहले आहे.
हा बॉक्स उघडताच त्यामध्ये गुलाबी रंगाच्या फुलांचे डिझाईन असलेली लग्नपत्रिका ठेवण्यात आलेली आहे.
पत्रिका उघडल्यानंतर सर्वप्रथम लक्ष्मी देवीची  प्रतिमा दिसते.
त्यानंतर कमळाच्या तसेच गुलाबांच्या फुलांचे क्राफ्ट असलेल्या लग्नपत्रिका आहेत.
या लग्नपत्रिकेत कृष्णाची देखील सुंदर प्रतिमा आहे.
ही भली मोठी लग्नपत्रिका खाली ठेवताच गायत्री मंत्राचा सुंदर ध्वनी ऐकायला मिळतो.
आतमध्ये आणखी एक मोठा बॉक्स दिसतो या बॉक्स ला कुलूप आहे.
हे कुलूप उघडताच त्यामध्ये चार छोटे छोटे खजिन्याच्या पेटीच्या आकाराचे सुंदर बॉक्स दिसतात. त्याला सोन्याचे लिंपण केले आहे.
त्यातील प्रत्येक बॉक्स मध्ये एक खास रत्नजडित दागिना  तसेच एका देवतेची प्रतिमा आहे.
यातील चोथ्या बॉक्स मध्ये सुगंधी अत्तराची कुपी देखील आहे.

मुकेश अंबानी यांनी पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांची जावई म्हणून निवड केली आहे. आनंद आणि ईशा हे दीर्घकाळापासून मित्र आहेत. दोन्ही कुटुंबामध्येही मागील ४० वर्षापासून चांगली संबंध आहेत. त्यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे.

कोण आहेत आनंद पिरामल

आनंद पिरामल हे १० अब्ज डॉलरच्या पिरमल समुहाचे कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय ते पिरामल इंडस्ट्रीजचे नॉन-एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आणि पिरामल रियाल्टीचे संस्थापक आहेत. आनंद पिरामल यांचे वडील अजय पिरामल, पिरामल समूहाचे अध्यक्ष आहेत. ७ मे २०१८ रोजी फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे रियल टाईम नेटवर्थ ४. ५ अब्ज डॉलर आहे.

आनंद पिरामल यांनी २०१२ मध्ये पिरामल रियाल्टीची स्थापना केली. आनंद ग्रुप स्ट्रॅटजी, वॅल्यू आणि ऑर्गनायजेशन डेव्लपमेंटसाठी ते सक्रीय आहेत. त्यांनी मुंबई लगतच्या अनेक प्राईम लोकेशनच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी एक उत्तम टीम बनवली आहे आणि वर्ल्ड क्लास डेव्लपमेंट डिझाईन केले आहे. कंपनीच्या विकासासाठी आनंद यांनी २०१५ मध्ये ४३. ४ कोटी डॉलर गोल्‍डमॅन सॉक्‍स आणि वारबर्ग पिनकसमधुन जमवले आहेत. भारतातील ही सगळ्यात मोठी खासगी इक्विटी इन्‍वेस्‍टमेंट आहे.