या’ भारतीय बॉलरची बॉलिंग अ‍ॅक्शन वादाच्या भोवऱ्यात

सिडनी : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताच्या अष्टपैलू खेळाडू अंबीती रायडूची बॉलिंग अ‍ॅक्शन वादात सापाडली आहे. पंचांनी रायडूची बॉलिंग करण्याची अ‍ॅक्शन चुकीची असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल भारतीय टीम मॅनेजमेंटला पाठवण्यात आला आहे. या अहवालात रायडूच्या बॉलिंग अ‍ॅक्शनबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
३३ वर्षाचा पार्ट टाईम स्पिनर असलेल्या अंबाती रायडू याला हिंदुस्थान ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात खेळवण्यात आले होते. त्या सामन्यात रायडूने दोन ओव्हरसाठी बॉलिंग केली होती. यात त्याने १३ रन्स दिले होते. या दरम्यान त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  मात्र त्यावेळी त्याने केलेली बॉलिंग चुकीच्या पद्धतीने केल्याचे पत्र पंचांनी हिंदुस्थानच्या टीम मॅनेजमेंटला पाठविले आहे. येत्या १४ दिवसात रायडूच्या बॉलिंगची चाचणी होणार आहे. मात्र त्या चाचणीचा निकाल येईपर्यंत रायडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार आहे.
आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार रायडूच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर नजर ठेवली जाणार आहे. तसंच येत्या १४ दिवसात रायडूला बॉलिंग अ‍ॅक्शनची चाचणीला तोंड द्यावे लागणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे या चाचणीचा निकाल येई पर्यंत रायडूला बॉलिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
क्रिकेमध्ये बॉलर्सच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवरुन वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अशा अनेक बॉ़लर्सच्या अ‍ॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. यात पाकिस्तानचा स्पिनर मोहम्मद हाफीज, सईद अजमल वेस्टइंडिजचा सुनील नारायण, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताच्या हरभजन सिंगच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवरून वाद निर्माण झाले होते.