अमित शहा पुण्यात ३ मतदारसंघांची एकत्रित बैठक घेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहर, बारामती आणि शिरूर मतदारसंघाची एकत्रित बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार आहेत.

अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. तीनही लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी, बूथप्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. बैठकीचा प्रारंभ साडेदहा वाजता होईल केंद्र सरकारच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचविणे, विविध योजनांचा तपशील मतदारांपर्यंत पोहोचविणे, निवडणुकीचा कार्यक्रम, पन्नाप्रमुखांचे मेळावे याची माहिती बैठकीत दिली जाईल.

अमित शहा, रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील. या बैठकीपूर्वी पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्रप्रमुखांचे मेळावे घेण्यात आले. कामांच्या जबाबदाऱ्या आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यावर सोपविण्यात आल्या असे गोगावले यांनी सांगितले.