… आणि मीनाताई यांच्या वेशात अमृता राव दिसली शिवाजी पार्क येथे 

मुंबई : वृत्तसंस्था – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘ठाकरे’ चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलर नंतर  या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टर मध्ये अभिनेत्री अमृता राव बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या रूपात दिसत आहे. या चित्रपटात अमृता राव ही मीनाताई ठाकरे म्हणजेच माँसाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृता नुकतीच  या वेशात शिवाजी पार्क येथे दिसून आली.
 ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता राव गुरुवारी शिवाजी पार्क येथे गेली होती .तिथे जाऊन तिने माँसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. माँ साहेबांच्या वेशात आलेल्या अमृताला पाहण्यासाठी लोकांनी त्यावेळी गर्दी केली होती. या ठिकाणी अमृताला पाहण्यासाठी लहान मुलींनीही गर्दी केली होती.
चित्रपटातील भूमिकेविषयी अमृताने सांगितले कि जेव्हा निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत  पानसे यांनी मला या भूमिके बद्दल विचारले तेव्हा त्यांनी संगितले की या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु केला तेव्हा त्याची सुरुवात माझ्यापासून सुरु होऊन माझ्यावरच  संपली.  मी नेहमी माझ्या भूमिकेतून  माझी  वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे , आणि ती ओळखही मी कदाचित तयार केली आहे. त्यामुळेच त्यांनी विचार करून या भूमिकेसाठी माझी निवड  केली.  कारण त्यांना मीच या भूमिकेसाठी योग्य वाटत होते. मीनाताई यांची भूमिका साकारून मला  खूप अभिमान वाटत आहे.