अॅम्बुलन्स आणि दुचाकीचा भीषण अपघात, २ तरुण जागीच ठार

जळगाव : पोलीसनामा आॅनलाइन – यावल तालुक्यातील डांभुर्णी गावा जवळील जळगाव मार्गावरील वळणावर दुचाकी व रूग्ण वाहिकेची समोरून जबर धडक होत घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत. मयतांची नावे समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी दोघे (रा.चांदसर बुद्रुक ता. धरणगाव) अशी आहेत. अपघातातील रूग्णवाहिका गर्भवती महिलेस घेवुन जळगाव येथे जात होती.

यावल तालुक्यातील विदगाव जळगाव रस्त्यावर डांभुर्णी कोळन्हावी गावाच्या दरम्यान पेट्रोलपंंप आहे. या पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर दुचाकी घेवुन समाधान भावलाल कोळी (२५) व अंकुश शाम कोळी (२४) रा. चांदसर बुद्रुक ता. धरणगाव हे जळगावकडून डांभुर्णीकडे जात होते तर, गरोदर महिलेला घेवुन डांभुर्णीकडून जळगावकडे रूग्णवाहिका क्रमांक घेवुन चालक शरद बाळकृष्ण जावळे (रा. सावखेडासिम) हे जात होते. वळणावर दुचाकी व रूग्णवाहीका समोरा समोर धडकल्या हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी वरील दोघं घटनास्थळीच क्षणार्धात ठार झाले तर, अपघातानंतर रूग्णवाहिका जागेवर सोडून चालक पसार झाला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदना करीता जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. विकास जगन्नाथ सोळुंके यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात रूग्णवाहिकेच्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस नगरमधून प्रारंभ 

संदीप हरी कोळी हा मुळ चांदसर येथील असून सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडे टाटा मॅजिक गाडी असून तो स्वत: चालक आहे. किनगाव , जळगाव, डांभुर्णी या मार्गावर तो प्रवासी वाहतुक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वाहन घेऊन आलेल्या एका चालकाने डांभुर्णीजवळ अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती संदीप यास सांगीतली. नंतर संदीप वाहन घेऊन घटनास्थळी गेला. त्याने दोघा बेशुध्दावस्थेत पडलेल्या युवकांजवळ जाऊन पाहिले असता मयतांची ओळख पटली. नंतर त्याने घटनेची माहिती चांदसर येथे देऊन दोघांनी वाहनात टाकून सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणले. सायंकाळी चांदसर येथील ग्रामस्थासह मयतांच्या नातेवाईकांनी धाव घेतली.