ताज्या बातम्या

आनंद तेलतुंबडे यांना तात्पुरता अटकपूर्व दिलासा

२२ फेब्रुवारीला होणार सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – प्रा. आनंद तेलतुंबडें यांना मुंबई उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यावर २२ तारखेला पुढील सुनावणी होणार असून 14 आणि 18 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत. तेलतुंबडे अटक करण्यात आली तर १ लाख रुपयांचा बॉन्ड भरुन तात्काळ सुटका करण्यात यावी असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

आनंद तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरविण्यात आली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाने त्यांना 12 तारखेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले होते. आज त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना उच्च न्यायालयाने  22 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला तर 14 आणि 18 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या