‘या’ अभिनेत्याची मुलगी करत आहे ‘कार्तिक आर्यन’ ला डेट

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनला चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे डेट करत असल्याचे वृत्त समोर आले  आहे. या दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहण्यात आले आहे. सध्या सारा अली खानने देखील कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सिनेमातून कार्तिक प्रकाश झोतात आला होता.

अनन्या पांडे लवकरच ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. यात तिच्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ नंतर आलिया कार्तिक सोबत पति पत्नी और वो च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची अजून ऑफिशल घोषणा झालेली नाही.

तसेच कार्तिक ‘लव आजकल’च्या सीक्वलमध्ये सुद्धा दिसणार आहे. कार्तिकच्या अपोझिट साराचे नाव निश्चित करण्यात आले आहे, असे इम्तियाजने सांगितले. काही दिवसांपूर्वीच कार्तिकला करण जोहरच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.