अभिनेता अनिल कपूरने घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट 

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी आयुष्मान खुराना, विकी कौशल, आलिया भट, रणबीर कपूर, राजकुमार राव, करण जोहर व एकता कपूर यांच्यासोबत बरेच कलाकार मोदींच्या भेटीला गेले होते. यानंतर बॉलिवूडचा अभिनेता अनिल कपूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
या भेटीची माहिती अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरून देत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल कपूर एकमेकांसमोर बसलेले दिसत आहेत. या भेटीमुळे अभिनेता अनिल कपूर खूप उत्साहित असलेले या फोटोतून दिसते आहे. या फोटोसोबत अनिल कपूरने लिहिले की, ‘मला आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली, मी त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे प्रेरीत झालो आहे. त्यांचा करिश्मा आपल्यावर नक्कीच प्रभाव टाकतो. मला खासगी भेटल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे’.
पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हाही करण जोहर ,अक्षयकुमार ,अजय देवगणयांसारख्या अनेक दिगज्ज कलाकार आणि दिग्दर्शक, निर्मात्यांनी त्यांची भेट घेतली होती. भेटी दरम्यान चित्रपट निर्मिती मधील अनेक समस्या,आव्हाने व चित्रपटाच्या भविष्याविषयी  त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली होती.