‘नोटा’ने नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नको : अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ज्या ठिकाणी नोटा पर्यायास सर्वाधिक पसंती मतदार देतील त्या मतदार संघात फेरनिवडणुक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत केले असून यामध्ये काही सुधारणा करण्याचे आवाहन आयोगाला केले आहे. नोटाने नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा घेण्यात येणाऱ्या फेरमतदानात संधी देऊ नये, अशी मागणी अण्णांनी केली आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले की, नोटा पर्यायाला उमेदवारांपेक्षा जास्त मतदान होणे, म्हणजे मतदारांनी या सर्व उमेदवारांना नाकारले आहे. त्यामुळे फेरमतदान घेताना यातील कोणत्याही उमेदवाराला पुन्हा निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे, अशी सुधारणा करण्याचे आवाहन अण्णांनी केले आहे. लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी हे गरजेचे असून भ्रष्ट, चारित्र्यहीन आणि गुंडप्रवृत्तीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी हे गरजेचे असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष सुद्धा यातून धडा घेतील. तसेच अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देणार नाही. असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 
बळीराजाने सरकारला एक दमडीचीही अोवाळनी देऊ नये : राज ठाकरेंचे आणखी एक व्यंगचित्र
भाजपचा मुस्लिम महिलांच्या मतांवर डोळा 
भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानीला लगाम, डेमोक्रॅटिक पक्ष बळकट