माहेश्वरी फाऊंडेशनकडून ‘अन्नकूट’ महोत्सवाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – लोकांचे रक्षण करण्याकरिता एका करंगळीवर गोवर्धन पर्वत ज्याने उचलला, या सृष्टीचा पालनहार गोवर्धन गिरीधारी च्या आठवणीतील तो पवित्र दिवस म्हणजे अन्नकूट. या पवित्र दिवसाचे आैचित्य साधत माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनकडून दि. १८ नोव्हेंबर रोजी दिपावली स्नेहमिलन व अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अन्नकूट उत्सव समितीने सर्व माहेश्वरी समाज बांधवांना अन्नकूट कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच दि. ५ व जानेवारी २०१९ रोजी जोधपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय माहेश्वरी समाज’ अधिवेशनालाही समाज बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या समाजबांधव, संस्था, महिला मंडळांना अन्नकूट महाप्रसाद वितरण सेवा द्यायची असेल त्यांनी ९८८१४९३७२१ या क्रमांकावर द्यावीत. तसेच महाप्रसाद वितरण सेवे करिता सायं. ५ वाजतापासून बॅचेसचे वितरणक करण्यात येईल, असे अन्नकूट समितीकडून सांगण्यात आले आहे.

हा अन्नकूट चा कार्यक्रम फक्त माहेश्वरी बांधवांसाठी आयोजित केलेला आहे. माहेश्वरी चारिटेबल ट्रस्टच्या विश्वस्थाकडून आणि सर्व संस्थाकडून माहेश्वरी बांधवाना अन्नकूटच्या कार्यक्रमाला सहभागी होण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.