काँग्रेसच भाजपची ‘बी टीम’ : आण्णाराव पाटील यांचा घणाघाती आरोप !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि भाजप यांचीच साठ-गाठ असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आण्णाराव पाटील यांनी केला आहे.

आण्णाराव पाटील म्हणाले, नागपुर मधील उमेदवारी काँग्रेसने नाना पटोले यांना देऊन काॅंग्रेस भाजपची बी टीम असल्याचे दाखवून दिले आहे. ज्यांच्यावर खैरलांजीसारख्या प्रकरणारतील लोकांना पाठीशी घालण्याचा आरोप आहे त्यांना आज काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाते. भाजपाला तिथे फायदा पोहचवण्यासाठीच काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. असा आरोप त्यांनी केला.

जे बहुजन वंचित आघाडीला भाजपाची बी टीम आहे असं संबोधतात त्यांनी हे लक्षात घ्यावे की, आमची लक्षणं चांगली आहेत. तर काँग्रेसच भाजपची बी टीम असल्यासारखं काम करत आहे. काँग्रेस सोबत जी शेवटीची बेठक झाली त्यात आम्ही जे उमेदवार दिले त्यांना काँग्रेस च्या तिकिटावर लढवावे असा प्रस्ताव दिला. दलित, मुस्लिम, ओबीसी समाजाची मतं विभागू नयेत आणि धर्मांध पार्टीला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने ते मान्य केलं नाही. आता आम्ही आमचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार लवकरच जाहीर करू अशी माहिती आण्णाराव यांनी दिली.

भारिप, एमआयएम, आणि महाराष्ट्र विकास आघाडी हे तीन मुख्य पक्ष मिळून आम्ही भाजपाला आहवान देणार असल्याचेही आण्णाराव पाटील यांनी सांगितले.

ह्याही बातम्या वाचा-

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’ 

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मशिदीमध्ये गोळीबार ; ६ जणांचा मृत्यु