राज्यातील ‘त्या’ 86 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी ‘अच्छे दिन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सन 2006 मध्ये औरंगाबाद आणि मालेगाव परिसरात कारवाई करून मोठा शस्त्रसाठा जप्‍त करणार्‍या ‘त्या’ 86 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना खरच ‘अच्छे दिन’ आले आहेत. सन 2006 मध्ये केलेल्या कामगिरीसाठी त्यांना राज्य सरकारने तब्बल 10 लाख 80 हजाराची बक्षिसे मंजूर केली आहेत. तब्बल 12 वर्षांनी ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामाचे चीज झाले आहे. आघाडी सरकारच्या काळातच त्यांचा गौरव होणे अपेक्षित होते मात्र आता खरच युती सरकारच्या काळात त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. उशिरा का होईना राज्य सरकारने केलेल्या बक्षिसाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या कामाची दखल घेतल्यामुळे त्या 86 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना आनंद झाला आहे. ‘त्या’ 86 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांपैकी काही जण सेवेतुन निवृत्‍त झाले आहेत.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दि. 9 ते दि. 15 मे 2006 दरम्यान औरंगाबाद आणि मालेगाव परिसरात कारवाई करून 16 एके 47 रायफल्स, 3200 राऊंडस, 62 मॅगझीन्स पाऊच, 43 किलो आरडीएक्स स्फोटक पावडर आणि 50 हॅन्डग्रेनेडस जप्‍त केली होती तर जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु जिंदाल याच्यासह 22 आरोपींना अटक केली होती. एटीएसच्या तपासानुसार सिमी व लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी राजकिय व धार्मिक नेत्यांच्या हत्येचा कट रचून त्यासाठी लागणारी शस्त्रात्रे व स्फोटके प्राप्‍त करून, त्याची वाहतूक करून साठा केल्याचे निष्पन्‍न झाले होते. याप्रकरणाची न्यायालयात दोषरोप सिध्दी होवुन आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास करणार्‍या एटीएसच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना राज्य सरकारने बक्षिसे मंजूर केले आहेत. प्रशस्तीपत्र आणि बक्षिसे मंजूर झालेल्यांची नावे आणि त्यापुढील कंसात बक्षिसाची रक्‍कम देण्यात आली आहे.
1.  तपासात भाग घेतलेले व मा. न्यायालयात साक्ष दिलेले पोलिस अधिकारी व अंमलदार :- सेवा निवृत्‍त सहाय्यक पोलिस आयुक्‍त किसन नारायण शेंगाळ ( 35 हजार रूपये), सेवा निवृत्‍त सहाय्यक पोलिस आयुक्‍त सदाशिव लक्ष्मण पाटील (30 हजार रूपये), सेवा निवृत्‍त दत्‍ता संभाजी ढवळे (35 हजार रूपये), सेवा निवृत्‍त यशवंत रामचंद्र तावडे (30 हजार रूपये), सहाय्यक पोलिस आयुक्‍त अब्दूल समद अब्दूल रहेमान (30 हजार रूपये), सेवा निवृत्‍त सहाय्यक पोलिस आयुक्‍त विनोद सातव (30 हजार रूपये), सेवा निवृत्‍त सहाय्यक पोलिस आयुक्‍त वसंत मारूती ताजणे (25 हजार रूपये), सेवा निवृत्‍त सहाय्यक आयुक्‍त संजय आत्माराम खैरे (25 हजार रूपये), पोलिस निरीक्षक केशव पातोंड (25 हजार रूपये), सेवा निवृत्‍त पोलिस निरीक्षक अनंत घुगे (25 हजार रूपये), सहाय्यक पोलिस आयुक्‍त अ‍ॅन्थोनी स्टिव्हन मॅथ्यू (25 हजार रूपये), सहाय्यक पोलिस आयुक्‍त सुनिल लक्ष्मण देशमुख (25 हजार रूपये), सेवा निवृत्‍त पोलिस उप अधिक्षक विश्‍वनाथ नामदेवराव जटाळे (25 हजार रूपये), पोलिस निरीक्षक शिवाजी अवधुतराव ठाकरे (20 हजार रूपये), पोलिस निरीक्षक सुभाष रमेश दुधगांवकर (20 हजार रूपये), पोलिस निरीक्षक शशिकांत आनंदराव भंडारे (20 हजार रूपये), पोलिस निरीक्षक दिनेश परशुराम कदम (20 हजार रूपये), सेवा निवृत्‍त पोलिस निरीक्षक शंकर गंगाराम वाघ (20 हजार रूपये), सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद आसिफ सय्यद मोहमद (20 हजार रूपये), पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ आवारी (20 हजार रूपये), पोलिस निरीक्षक किसन अर्जुन गायकवाड (20 हजार रूपये), पोलिस निरीक्षक रमेश हनुमंतराव मोरे (20 हजार रूपये), सेवा निवृत्‍त पोलिस उपनिरीक्षक नारायण सुबराव पाटील (5 हजार रूपये), पोलिस हवालदार जगन्‍नाथ तुकाराम गोल्हार (5 हजार रूपये), सहाय्यक पोलिस उप निरीक्षक संजय केशव पाटील (5 हजार रूपये) आणि पोलिस हवालदार तानाजी संतू पाटील (5 हजार रूपये).
2. गोपनीय माहितीव्दारे गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक करण्यासाठी मदत करणारे मात्र मा. न्यायालयात साक्ष न झालेले पोलिस अधिकारी व अंमलदार :- सेवा निवृत्‍त सहाय्यक पोलिस आयुक्‍त अशोक नारायण कामत (15 हजार रूपये), सहाय्यक पोलिस आयुक्‍त सुनिल दरेकर (15 हजार रूपये), सेवा निवृत्‍त पोलिस निरीक्षक अरूण खानविलकर (15 हजार रूपये), सहाय्यक पोलिस आयुक्‍त दिनेश आहिर (15 हजार रूपये), सेवा निवृत्‍त पोलिस निरीक्षक दिनेश अग्रवाल (15 हजार रूपये), पोलिस निरीक्षक शशांक शेळके (15 हजार रूपये), पोलिस निरीक्षक मधुकर फड (15 हजार रूपये), पोलिस निरीक्षक शशिकांत एल. शिंगारे (10 हजार रूपये), पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे (10 हजार रूपये), पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे (10 हजार रूपये), धनंजय कंधारकर (10 हजार रूपये), पोलिस निरीक्षक सचिन मुरारी कदम (10 हजार रूपये), पोलिस निरीक्षक संदेश सदाशिव रेवाळे (10 हजार रूपये), पोलिस निरीक्षक निवृत्‍ती बापुराव कोल्हटकर (10 हजार रूपये), पोलिस निरीक्षक शेखर बागडे (10 हजार रूपये), सेवा निवृत्‍त सहाय्यक फौजदार दिलीप घाग (5 हजार रूपये), पोलिस उपनिरीक्षक सखाराम रेडकर (5 हजार रूपये), पोलिस हवालदार मोहन जनार्दन भाबल (5 हजार रूपये), पोलिस हवालदार अंकुश मुरारी परब (5 हजार रूपये), पोलिस उपनिरीक्षक हिंदुराव चिंचोळकर (5 हजार रूपये), पोलिस हवालदार प्रकाश भास्कर आव्हाड (5 हजार रूपये), पोलिस हवालदार विजय साळवी (5 हजार रूपये), पोलिस हवालदार गणेश राजीव जाधव (5 हजार रूपये), पोलिस हवालदार एस.के. मुरकुटे (5 हजार रूपये), पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न आगवने (5 हजार रूपये), पोलिस शिपाई संतोष गायकवाड (5 हजार रूपये), पोलिस हवालदार लक्ष्मण बोरकर (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी संदिप गीधा मांजुलकर (5 हजार रूपये), पोलिस नाईक दिनेश दशरथ गायकवाड (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी महेश रामचंद्र मुळे (5 हजार रूपये), पोलिस नाईक सुनिल माने (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी (स्वेच्छा निवृत्‍ती) सुनिल देसाई (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी संतोष हिंदुराव साळुंखे (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी आकाश मांगले (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी प्रफुल्‍ल अनंत पाटील (5 हजार रूपये), पोलिस नाईक सचिन यशवंत खताते (5 हजार रूपये) आणि पोलिस नाईक रूपेश नथुराम पाकळे (5 हजार रूपये).

3. कोर्ट लायझनींग टिम – सुनावणी कोर्ट, मा. उच्च व सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरणे चालविणारे अधिकारी व अंमलदार :- पोलिस निरीक्षक दिनकर नामदेव मोहिते (35 हजार रूपये), सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जनार्दन मोहिते (30 हजार रूपये), सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळू वंजारे (15 हजार रूपये), पोलिस उपनिरीक्षक गोरख रंगनाथ जाधव (10 हजार रूपये), पोलिस कर्मचारी शरद बाजीराव नाणेकर (10 हजार रूपये), पोलिस नाईक संदिप रामदास भोसले (5 हजार रूपये), पोलिस नाईक जयप्रकाश अनंत सुर्वे (5 हजार रूपये), पोलिस नाईक चंद्रसेन शंकर घत्तडगे (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी दिपक एकनाथ गालफाडे (10 हजार रूपये), पोलिस कर्मचारी तुकाराम दत्‍तात्रय राजीगरे (5 हजार रूपये), पोलिस नाईक होंडे शंकर भाऊसाहेब (5 हजार रूपये), पोलिस हवालदार महादेव सुदाम औटी (5 हजार रूपये), पोलिस नाईक प्रमोद माणिकराव टेकवले (10 हजार रूपये), पोलिस नाईक पोपट माधवराव मनगटे (5 हजार रूपये), पोलिस हवालदार मंगेश शरदचंद्र अभंग (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी मंजित पांडुरंग जाधव (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी अख्तर हाशिम शेख (5 हजार रूपये), पोलिस कर्मचारी सुदेश बबन उकारडे (5 हजार रूपये), पोलिस नाईक राजु अण्णा कदम (5 हजार रूपये), पोलिस नाईक महेश पांडुरंग मातेरे (5 हजार रूपये) आणि पोलिस नाईक अविनाश धुळजी ठिंगळे (5 हजार रूपये).