‘भजनसम्राट’ अनुप जलोटा ‘बेबी डाॅल’च्या प्रेमात, गायले सनी लिओनीचे गाणे

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

बिग बाॅसचा 12 वा सिझन चांगलाच रंगताना दिसत आहे. बिग बाॅसच्या पहिल्याच भागात अनुप जलोटा आणि त्यांची जसलिन मथारु यांच्या रिलेशनशिपच्या उलगड्याने तो प्रचंड गाजला. सोशल मीडिया वर या उलगड्याची खुप उलट-सुलट चर्चा झाली. आणि आता बिग बाॅसच्या घरात भजनसम्राट अनुप जलोटा यांनी चक्क सनी लिआेनच्या बेबी डाॅल या गाण्यावर ठेका धरला.
[amazon_link asins=’B078124279,B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d09acff4-bcb1-11e8-9884-8d5a4e2462dc’]

देशातील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस 12’ ला 16 सप्टेंबरपासून धमाकेदार सुरूवात झाली. आठवे स्पर्धक म्हणून भजन सम्राट अनुप जलोटा यांनी सहभाग घेतला आहे. बिग बॉसच्या घरात आता स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्याची सुरुवात झाली आहे. मागील भागात स्पर्धकांना ‘राजा-राणी’ हा टास्क देण्यात आला. यामध्ये अनुप जलोटा यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या टास्कदरम्यान भजनसम्राट सनीचे आयटम साॅंग ‘बेबी डॉल’ हे गाणे गाताना दिसत आहेत, तर त्यांच्याभोवती इतर स्पर्धक डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर जोरदार कंमेट करणे सुरू केले आहे. हा भाग गुरूवारी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.