१६ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

१६ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या

नव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील बदल्या आज मंगळवारी (दि. २३) पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केल्या आहेत. सोळा पाेलिस निरीक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.
सतीश पवार (देहूरोड वाहतूक), शहाजी पवार (पिंपरी पोलीस ठाणे), सुनील दहिफळे (चाकण पोलीस ठाणे), प्रकाश जाधव (नियंत्रण कक्ष), अजय जोगदंड (विशेष शाखा पडताळणी, पिआरओ), पांडुरंग गोफणे (भोसरी पोलीस ठाणे), विठ्ठल कुबडे (आळंदी-दिघी वाहतूक), राजेंद्र निकाळजे (तळेगाव दाभाडे), रवींद्र जोंधळे (विशेष शाखा, अतिक्रमण विभाग), अमरनाथ वाघमोडे (देहूरोड गुन्हे व प्रशासन), अजय भोसले (निगडी पोलीस ठाणे), मसाजी काळे (चिखली पोलीस ठाणे), बालाजी सोनटक्के (एम ओ बी, पीसीबी), सुधाकर काटे (युनिट दोन, सायबर गुन्हे), सुधीर असपत (खंडणी, दरोडा पथक), श्रीराम पोळ (अमली पदार्थ , आर्थिक गुन्हे) यांच्या नियुक्त्या आज करण्यात आलेल्या आहेत.

याच महिन्यात तीन तारखेला पिंपरी, हिंजवडी, निगडी, चिखली अाणि इतर पाेलीस ठाण्य़ातील पाेलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये कल्याण लक्ष्मण पवार (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन), भानुदास आण्णासाहेब जाधव (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन), विवेक एकनाथ लावंड (नियंत्रण कक्ष ते दिघी पोलीस स्टेशन), ब्रम्हानंद नाईकवाडी (गुन्हे शाखा ते आळंदी पोलीस स्टेशन), राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने (नियंत्रण कक्ष तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन), राजेंद्र पांडुरंग कुंटे (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी), भिमराव नामदेवरा शिंगाडे (भोसरी एमआयडीसी ते विशेष शाखा), खंडेराव दशरथ खैरे (दिघी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), बालाजी रघुनाथ सोनटक्के (नियंत्रण कक्ष गुन्हे शाखा),यशवंत नामदेव गवारी (नियंत्रण कक्ष हिंजवडी पोलीस स्टेशन), प्रदिप उत्तम लोंढे (नियंत्रण कक्ष निगडी पोलीस स्टेशन), विवेक वसंत मुगळीकर (पिं.चि.मनपा अतिक्रमण विभाग ते चिखली पोलीस स्टेशन), मसाजी गणु काळे (नियंत्रण कक्ष ते सी.पी. ऑफिस), सतिश विठ्ठलराव नांदुरकर (नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) एमआयडीसी भोसरी), दिलीप तुकाराम भोसले (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन) यांचा समावेश होता.