पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) विभाजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे विभाजन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) गुन्हे प्रकटीकरण आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी २ स्वतंत्र पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याच बरोबर नियंत्रण कक्षातील २ पोलीस निरीक्षकांच्या बारामती तालुका आणि आळेफाटा पोलीस ठाण्यात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी (दि.१७) रात्री उशिरा दिले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे विभाजन करण्यात आले असून गुन्हे प्रकटीकरण करण्यासाठी पोलीस निरीक्षक पद्माकर भास्करराव घनवट यांची तर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचा स्वतंत्र पदभार होता. घनवट हे नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते आता त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात नियुक्तीस असलेले पोलीस निरीक्षक धन्याकुमार चांगदेव गोडसे यांची बारामती तालुका तर पोलीस निरीक्षक तय्यब युनूस मुजावर यांची आळेफाटा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. या ४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या या प्रशासकीय कारणामुळे करण्यात आल्या असल्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

१ हजाराची लाच घेणारा पोलीस काॅस्टेबल ‘एसीबी’च्या जाळ्यात