सैराटची आर्ची पोलीस बंदोबस्तात बारावीची परीक्षा देणार काय ?

टेंभूर्णी : पोलीसनामा ऑनलाईन – सैराटची आर्ची बारावीची परीक्षा देणार आहे. तिच्या परीक्षा केंद्राला संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सैराट या प्रचंड गाजलेल्या चित्रपटाची नायिका प्रेरणा महादेव राजगुरू परीक्षा द्यायला असल्यावर चाहत्यांची गर्दी उसळू शकते. म्हणून परीक्षा केंद्राला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

गुरुवारी २१ फेब्रुवारी पासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. आर्ची हि कला शाखेची बहिस्थ विद्यार्थीनी आहे. तिने कला शाखेचे इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र व भूगोल हे विषय निवडले आहेत. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयात तिने परीक्षेसाठीचे केंद्र निवडले आहे. याच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षा केंद्राला पोलीस संरक्षण मागितले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अर्ज करून पोलीस संरक्षण मागितले आहे.

हेही वाचा – म्हणे महाराष्ट्रात गुटखा बंदी ! बोरी गावात १ कोटीचा गुटखा जप्त 

दरम्यान आर्चीने याआधी बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून १० वीची परीक्षा दिली आहे. तेव्हा तिला ६६.४० टक्के गुण मिळाले होते. तेव्हा तिचे परीक्षा केंद्र माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे आले होते.