मोबाईल कंपनीच्या कॉल्स मुळे वैतागला आहात ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड वापरत असला तरी कंपन्यांकडून केले जाणारे मेसेजेस आणि प्रमोशनल कॉल हे नेहमीच त्रासदायक ठरतात. कामात किंवा मिटिंग मध्ये असताना नेमका कंपनीचा प्रमोशनल कॉल येतो. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पण आता थोडी सेटिंग बदलली तर या कंपन्यांच्या डिस्टरबिंग कॉल्स पासून तुमची सुटका होऊ शकते. याकरिता तुम्हाला फक्त ‘DND’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब ‘ ही सर्व्हिस अॅक्टिव्हेट करावी लागेल. विशेष म्हणजे ही सेवा फ्री असून नंतर अॅक्टिव्हेट देखील करता येते.

प्रत्येक कंपनी करिता ही सर्व्हिस सुरु करण्यासाठी वेगळी पद्धत वापरावी लागेल. खाली काही कंपन्यांची ‘DND’ सर्व्हिस ची माहिती दिली आहे.

एअरटेल

— एअरटेलच्या संकेतस्थळावर जाऊन डीएनडी पेजवर टॅप करा.
–त्यानंतर एअरटेल मोबाईल सर्व्हिस बटन जवळील Click here लिंकवर क्लिक करा.
–त्यानंतर पॉप-अपमध्ये मोबाईल नंबर टाका आणि ‘Get One Time Password’ बटनवर क्लिक करा.
–फोनवर आलेला OTP एन्टर करा. ‘Stop All’ ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ‘Submit’ बटनवर क्लिक करा.

व्होडाफोन

–व्होडाफोनमध्ये अॅक्टिव्हेट करण्यासाठी Vodafone DND page वर लॉग-ऑन करा.
— यानंतर तुम्हाला काही डिटेल्स मागण्यात येतील. उदाहरणार्थ नाव, ईमेल आयडी आणि व्होडाफोन मोबाईल नंबर. हे सर्व Enter करा.
–त्यानंतर ‘Full DND’ ऑप्शनमध्ये ‘Yes’ वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.
त्यानंतर ‘Submit’ बटनवर क्लिक करा. तुमच्या नंबरवर DND अॅक्टिव्ह होणार.

जिओ

–जिओमध्ये डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी मोबाईलमध्ये MyJio अॅप ओपन करा.
–त्यानंतर टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये जाऊन मेन्यू Expand करा.
— Setting ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ‘Service Settings’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Do not disturb’ वर क्लिक करा.
–यामध्ये ‘Full DND’ टॉगल ऑन केल्यानंतर ‘Submit’ वर क्लिक करा.

अन्य नेटवर्कसाठी कसे कराल DND अॅक्टिव्ह

– अन्य नेटवर्क्सवर तुम्ही एसएमएस किंवा कॉल करुन DND अॅक्टिव्हेट करू शकता. तुम्ही १९०९ वर कॉल करुन मिळालेले निर्देश फॉलो करा किंवा ‘Start 0’ लिहून १९०९ वर पाठवू शकता. अशाप्रकारे सर्व नेटवर्क्सवर तुम्ही DND सुरू करू शकता.