पैसे घेऊन निवडणूक प्रचार करण्यास ‘हे’ सेलिब्रेटी झाले तयार

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक येत्या मार्च मध्ये आहे. अनेक राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी कलाकारांचा वापर करतात. आता याच कलाकारांचे नाव एका स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडले आहे. एका वेबसाईटने असा दावा केला आहे. की काही कलाकार पैशांच्या मोबदल्यात राजकीय पक्षांच्या अजेंड्याचा प्रचार सोशल मीडियावर करण्यास तयार झाले आहे. याप्रकरणी या वेबसाईटने एक यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ३० पेक्षा अधिक जास्त सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. याप्रकरणी वेबसाईटने व्हिडियो ही शेअर केले आहे.

या वेबसाईटने एक स्टिंग ऑपरेशन केलं होत ज्यामध्ये कलाकारांच्या मॅनेजरशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डील करण्यासाठी संपर्क साधला होता. पैसे घेऊन पक्षाचा प्रचार करण्यास तयार झालेल्या सेलिब्रेटींची नावे या वेबसाईटने जाहीर केली आहे. या नावांमध्ये जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे यांचा समावेश आहे.

तर अभिनेत्री विद्या बालन, रजा मुराद, सौम्या टंडन आणि अर्शद वारसी यांसारख्या कलाकारांनी पैसे घेण्यास नकार दिला आहे. आम्ही काही कलाकारांना पैशांचं आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. पण या कलाकारांनी आमिषाला बळी न पडता थेट त्यांचा नकार कळविला  यावर प्रतिक्रिया देत काही सेलिब्रेटींनी हे आरोप फेटाळून लावले आहे.यावर स्पष्टीकरण देत अभिनेता सोनू सूदने परिपत्रक जाहीर करून संबंधीत प्रतिनिधींशी झालेला संवाद चुकीच्या पद्धतीने मांडल्याच सांगितलं आहे.

तर सनी लिओनी ने एक ट्विट केले आहे ‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नाहीये आणि जर मी प्रचार करण्याचं ठरवलं तर मी ते जाहीरपणे सांगेन. इतकंच नाही तर ज्या गोष्टी माझ्या मनाला पटतील, आणि ज्यात मला सत्यता वाटेल त्याच गोष्टी मी करेन’, असं ट्विट सनीने शेअर केलं आहे.