पंढरपूर : दर्शनाच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारे अटकेत

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील भावीक पंढरपूरात येत असतात. दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घडवून देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा पंढरपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील दोघांना अटक करण्यात आली असून या रॅकेटचा मुख्य सुत्रधार हा मंदिर समिताचा सदस्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मंदिर समितीच्या सदस्याला ताब्यात घेतले आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce4e014b-ae08-11e8-a682-3f981d606ce6′]

कैलास डोके व विजय देवमारे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर मंदिर समितीचा सदस्य सचिन अधटराव याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी हैदराबाद येथील श्रीनिवासराव प्रसादराव पिट्टे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे.

हैदराबाद येथील श्रीनिवासराव प्रसादराव पिट्टे (वय ५०) व त्याची पत्नी लक्ष्मी श्रीनिवास पिट्टे (दोघे रा. जयप्रकाशनगर, अमीरपेठ, हैद्राबाद) विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गुरुवारी आले होते. यावेळी हार विक्रेते कैलास डोके यांनी त्याच्याशी संपर्क साधून पैसे दिल्यास थेट विठ्ठलाचे दर्शन घडवितो असे सांगितले. त्या दोघांकडून प्रत्येकी चारशे रुपये प्रमाणे आठशे रुपये घेतले. मात्र या घडामोडी घडत असताना मंदिर परिसरात सुरक्षितेसाठी असलेले पोलीस कर्मचारी पोलीस नाईक वामन यलमार हे लक्ष ठेवून होते.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’afdc2964-ae09-11e8-adc1-b338b311bbbb’]

हैदराबाद येथील पती-पत्नी तुकाराम भवन येथून पास घेऊन आल्यानंतर सुरक्षा कर्मचारी पोलीस नाईक यलमार यांनी त्या भाविकांना विचारणा केली. त्यावेळी पट्टे यांनी कैलास डोके यांने आमच्याकडून आठशे रुपये घेतले व दर्शनाचा पास दिला असे सांगितले यलमार यांनी पास संदर्भात तपासणी केली असता या पासचा आदेश मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी दिला होता. व हा दर्शन पास कैलास डोके यांनी घेतला होता.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d49620b1-ae08-11e8-a60c-c962d451cbc7′]

यामुळे कैलास डोके यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पास देणारा केलास डोके याला पोलिसांनी शनिवारी अटक केली असून यामध्ये आणखी एक विजय देवमारे हा सहभागी असल्याचे निदर्शनास आले. या दोघांना अटक करुन पंढरपूर न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, दर्शन काळाबाजार प्रकरणी पहिल्यांदाच मंदिर समिती सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार उघडकीस आला आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी