सहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या इसमास अटक 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

सहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमास पोलीसांनी अटक केली आहे. अयोध्यानगर भागात ही खळबळजनक घडली. या नराधमाने बालिकेसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रमेश भिवगडे असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे पीडित बालिकेला त्याने नात मानले होते.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B07DFL5NML’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c61d7365-baf6-11e8-bf8f-0b2fe0ae18ef’]

६ वर्षांची पीडित बालिका नागपूरच्या अयोध्यानगर भागात आई-वडिलांसोबत राहते. कामानिमित्त पीडितेचे आई-वडील दिवसभर घराबाहेर असतात. त्याच परिसरात राहणारा आरोपी रमेश याचे पीडितेच्या घरी नेहमी येणे-जाणे असल्याने तो पीडितेच्या कुटुंबातील विश्वासू व्यक्ती होता. त्यामुळे पीडित बालिका रमेश यास आपले आजोबा मानत त्यांच्यासोबत खेळत असे. मात्र आरोपी रमेश हा पीडितेला गच्चीवर नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता.

हा प्रकार जवळच्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने पाहिला. त्या महिलेने रमेश त्या चिमुकल्या पीडितेसोबत करत असलेले अनैसर्गिक कृत्य मोबाईलमध्ये चित्रित केले आणि पोलिसांना दाखवले.
[amazon_link asins=’B00TFGVULI,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce1bf552-baf6-11e8-bbe1-f3296eab6521′]

पोलिसांनी या प्रकाराची माहिती पीडितेच्या पालकांना दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी रमेशवर बाल लैगिंक छळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.