क्राईम स्टोरी

भूमी अभिलेखचे उपसंचालक वानखेडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल १०० कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अ‍ॅड. रोहित शेंडे याला पकडले. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांची देखील चौकशी करण्यात आली. दरम्यान वानखेडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने वानखेडे यांचा बदाने कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाच प्ररणाची आज न्यायालयात सुनावणी झाली. उपसंचालक वानखेडे यांनी याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता मात्र त्यांच्याकडे चौकशी करायची असल्याचे सरकारी पक्षाने युक्तीवाद सादर केला. न्यायायाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत वानखेडे यांचा जामीन अर्ज फेटळून लावला.

पर्वती टेकडीच्या जवळ एक ८० गुंठे जमीन असून त्यातील काही भागावर अतिक्रमण झाले आहे. याशिवाय या जागेवर इतरांची नावे लागली आहेत. ही नावे काढून टाकणे व त्याचे टायटल क्लिअर करुन दिल्यावर ही जमीन विकण्याबाबत जमीन मालक आणि एका बांधकाम व्यावसायिकाचा करार झाला आहे. जमीन मालकाने या जागेची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी या बांधकाम व्यावसायिकाला दिली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून या जागेवर लागलेल्या इतरांची नावे काढून टाकण्याचे काम करण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाने या जागेची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी एका वकिलाच्या पत्नीच्या नावे केली. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये या वकिलाने भूूमी अभिलेख विभागाकडे अपिल दाखल केले होते. त्याची सुनावणी उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्याकडे सुरु होती. भूमी अभिलेखांच्या उपसंचालकांनी निकाल दिल्यानंतर एका तासाभरात रोहित शेंडे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. रोहित हा वानखेडे यांच्यासाठी काम करत होता.
याप्रकरणात लाचलुचपत विभागाने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांचे ही जबाब नोंदवले आहेत. याप्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रथमच लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम १२० (ब)  हा गुन्ह्याचा कट रचने यानुसार कलम लावले आहे. अ‍ॅड. शेंडे व वानखेडे यांनी लाच घेण्याचा हा एक प्रकारे कट रचल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात आणखी काही जणांचाही समावेश आहे का, याचा एसीबीकडून तपास सुरु आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या