इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी अरूण वीर यांची निवड

वालचंदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अरूण वीर यांची निवड झाल्याबद्दल आज वालचंदनगर बाजारपेठेतील व्यापारी बांधवांच्या वतीने फेटा, हार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय  शरदचंद्र पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार  खासदार  सुप्रियाताई सुळे,लोकप्रिय आमदार  दत्तात्रय भरणे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  प्रदीपदादा गारटकर यांचे विचार व कार्य समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता यापुढील काळात इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  महारूद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खजिनदार  अरूण वीर यांनी सांगितले.

वालचंदनगर आय एम डी कामगार समन्वयक संघ व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते  शिवाजीराव खटकाळे यांनी  अरूण वीर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी वालचंदनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजु  भाटीया, मार्गदर्शक  पोपट  मिसाळ, वालचंदनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य  अंबादास  शेळके, ग्रामपंचायत सदस्य  विजयशेठ कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेतृत्व  अमर निंबाळकर,इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष ईकबाल शेख, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष  अनिल थोरात,  धिरज मरवडकर, गिरीश  शाह ,  दत्तात्रय शेंडे, उपस्थित होते.