पोलीस घडामोडी

आरोपीचा वाढदिवस साजरा करणे सहायक पोलीस निरीक्षकाला (API) पडले महागात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बहुचर्चित मुशीर आलम हत्याकांडातील मुख्य आरोपी उमेश आठवले याचा वाढदिवस न्यायालयातील प्रतिक्षालयात साजरा केल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचाऱ्यांची २ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी सदर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून ही कारवाई केली आहे.

शहरातील साबनपुरा परिसरात उमेश आठवले व त्याच्या ६ साथीदारांनी १ नोव्हेंबर २०१५ रोजी मुशीर आलम यांची हत्या केली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ६ ऑक्टोबर रोजी कारागृहात असलेल्या उमेश आठवले याच्यासह अन्य आरोपींना गार्ड ड्युटीवर असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी न्यायालयात आणले होते. याचदिवशी उमेश आठवले याचा वाढदिवस होता. त्यामुळे नातेवाईक व त्याच्या समर्थकांनी न्यायालयात केक आणला होता.

यावेळी न्यायालयातील प्रतिक्षालयात गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच केक कापून आरोपी उमेश आठवले याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सोशल मीडियावर सदर छायाचित्रे वायरल झाल्यावर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्याकडे चौकशी सोपविली होती.

२ महिन्यांच्या चौकशीनंतर अहवाल पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यात कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद करण्यात आल्याने सदर पाच कर्मचाऱ्यांची २ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या