संसदेत अटलजींच्या तैलचित्राचे अनावरण 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचे अनावरण आज संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) करण्यात आले आहे. हा तैलचित्र अनावरण समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह केंद्राच्या मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच विरोधी पक्षाचे नेते देखील उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय आदर्श नीती सोबत कदापी समजोता करता येणार नाही एवढे त्यांचे राजकीय आदर्श श्रेष्ठ होते. एकाद्या विरोधी पक्षाच्या व्यक्तीचा हि आपण आदर कसा राखला पाहिजे हे अटलजींची राजकीय नीती आपणास शिकवते असे या प्रसंगी नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर सरकारने त्यांच्या समाधी स्थळाला २५ डिसेंबर २०१८ रोजी ‘सदैव अटल’ हे नाव देऊन देशाला समर्पित केले होते. आज अटलजींचे तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावून अटलजींच्या निधना वेळी दिलेल्या आश्वासनाची स्पुर्ती केली आहे.