बँक कर्मचा-याला पितापुत्राकडून मारहाण 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कर्ज खाते (लोन अकाउंट) उघडण्यासाठी मदत करणा-या बँक कर्मचाऱ्याला पितापुत्राने धक्काबुक्की केल्याचा प्रकार आळंदी येथील कॉर्पोरेशन बँकेत घडला.

याप्रकरणी मंदार दिलीप गाढवे (32, रा. च-होली बुद्रुक) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर राजाराम पोपट लोखंडे, पोपट लोखंडे (दोघे रा. मरकळ) या पितापुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणेकरांना करवाढीचा दणका ! 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार कार्पोरेशन बँकेच्या आळंदी शाखेत कर्मचारी म्हणून काम करत आहेत. राजाराम याला बँकेत कर्ज खाते सुरु करायचे होते. त्याबाबत बँकेच्या व्यवस्थापक वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, कर्ज खाते उघडण्यापूर्वी खातेदाराची बचत खाते बँकेत असणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदार त्यांना बचत खात्याचा फॉर्म भरून देतो असे म्हणाले. यावरून राजाराम याने रागात येऊन मंदार यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत ‘तुला माझ्याकडून कर्जसाठी लाच पाहिजे’ असे म्हणत उद्धट वर्तन केले. राजाराम याचे वडील पोपट यांनीही मंदार यांना शिवीगाळ करत मारण्यासाठी चप्पल उगारली. यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  तपास आळंदी पोलीस करीत आहेत.