आमदारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने घेतले विष

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – देवीची आरती करण्याच्या तयारीत असणारे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर एका हल्लेखोराने लगेचच सोबत आणलेल्या बाटलीतील विष प्राशन केल्याची घटना हदगाव येथे घडली आहे. हदगाव शहरात आ. पाटील आष्टीकर हे चार वर्षांपासून नवरात्रौत्सव साजरा करतात. या उत्सवाच्या वर्गणीवरून वाद झाल्यानंतर ही घटना घडली.

पत्नीचा खून करून पळालेल्या रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला

एका जुगार क्लब चालकाने आपल्याच सहकाऱ्यांकडून दुर्गादेवीला वर्गणी द्यायची म्हणून सुमारे २५ हजार रुपये वसूल केले. त्यामुळे त्या क्लब चालकातील एका भागीदाराने दोन दिवसांपासून मंडपाच्या समोर येऊन आम्ही वर्गणी दिली, असे म्हणत गोंधळ घातला. तसेच शिवसैनिकांना डिवचले. त्यामुळे ही बाब आ. नागेश पाटील आष्टीकरांना समजल्यावर त्यांनी आपली बदनामी करणाऱ्या व महोत्सवाच्या नावावर पैसे गोळा केलेल्या व्यक्तीला बोलावून घेतले. मी कोणालाही वर्गणी मागत नाही. मग तुम्ही का रक्कम जमा केली, ती ज्याची त्यांना परत देऊन टाका, अशी समज दिली. परंतु त्या व्यक्तीने उध्दट भाषा वापरून आ. आष्टीकरांचा अपमान केला. यावेळी दोघांत शाब्दिक चकमक झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या आ. आष्टीकरांचे स्वीय सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर व विष घेतलेल्या हल्लेखोराला नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले.

अयोध्या वारीसाठी शुभेच्छा ! पण…. पुन्हा एकदा मनसेची पोस्टरबाजी


पत्नी पळून गेल्याने एकाची आत्महत्या

बीड : पत्नी गावातीलच एकासोबत पळून गेल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना धारवंटा (ता. गेवराई) येथे घडली. लक्ष्मण हरिभाऊ पुरी (४०, रा. धारवंटा, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण व त्यांची पत्नी सुनीता ऊसतोड मजूर आहेत. १० दिवसांपूर्वीच त्यांनी दोन लाख रुपयांची उचल घेतली होती. तलवाड्यातील देवीच्या दर्शनासाठी दोघेही गेले असताना गर्दीत पती लक्ष्मणची नजर चुकवून सुनीता गायब झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. यासंदर्भात तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. अधिक चौकशी केली असता गावातीलच रामचंद्र वारुळे याच्यासोबत ती पळून गेल्याचे समजले. यानंतर पतीने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली