ऑस्ट्रेलियाची भारतावर ३४ धावांनी मात

सिडनी : वृत्तसंस्था – पहिला वन डे इंटरनॅशनल सामन्या भारताचा ३४ धावांनी पराभव करुन करुन ऑस्ट्रेलियाने मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज ४ धावांवर माघारी परतले. रोहित शर्मा (१३३) आणि महेंद्रसिंग धोनी (५१) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.

मात्र, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक इतके वाढले की भारताचा विजय दूरावला. मात्र, रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीयांना विजयाच्या आशा होत्या. रोहित ४६ व्या षटकांत माघारी परतला़ रोहितने १२९  चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांसह 133 धावांची खेळी केली. भारताला ५० षटकांत ९ बाद २५४ धावा करता आल्या.

भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन, अंबाती रायुडू आणि कोहली हे अवघ्या ४ धावांवर माघारी परतले. त्यावेळी भारताची धावसंख्या होती़ ३ बांद ४ अशी. त्यानंतर रोहित व धोनीने सामन्याची सूत्र हाती घेत सुरुवातीला संयमी आणि खेळपट्टीवर टिकल्यानंतर आक्रमक खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. रोहित आणि धोनी यांनी अर्धशतकी खेळी केली. धोनी ५१ धावांवर माघारी परतल्यानंतर रोहितने खिंड लढवली. मात्र, ४६ व्या षटकात तो बाद झाला.

त्या अगोदर उस्मान ख्वाजा (५९), शॉन मार्श (५४) आणि पीटर हँड्सकोम्ब (७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर २८९ धावांचे आव्हान ठेवले. मार्कस स्टोइनिसने ( नाबाद ४७) अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी. आॅस्ट्रेलियाने ५ बाद २८८ धावा केल्या.

रोहित शर्माचा विक्रम रोहितने वन डेतील ३८ वे अर्धशतक पूर्ण करून विक्रमाला गवसणी घातली.  रोहितने वन डेत सलग तिसऱ्यांदा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सहाव्यांदा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक ५० हून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी आला आहे. तेंडुलकर या क्रमवारीत (११) आघाडीवर आहे. रोहितने एकूण ९ वेळा  ऑस्ट्रेलियात  ५०हून अधिक धावा केल्या आहेत आणि त्याने कोहलीला (८) मागे टाकले.