भारताला नमवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची ‘ही’ अजब तयारी

सिडनी :  वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रोलियाच्या वन डे मालिकेला 12 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरावल्यानंतर भारतीय खेळाडूंमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासोबतच्या वन डे मालिकेत त्याच उत्साहाने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. मात्र ऑस्ट्रेलिया आपल्या विरुद्ध संघाचे खच्चीकरण करण्यासाठी नेहमीच काहीना काही माईंड गेम खेळत असते. यावेळी ऑस्ट्रेलियाने वेगळाच हातकंडा वापरला आहे. एकदिवसीय मालिकेत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ 33 वर्ष जुनी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

https://twitter.com/ESPNcricinfo/status/1083286464794750976

1986 मध्ये अॅलन बॉर्डर हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते, त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ गडद पिवळ्या सोनेरी रंगाच्या जर्सीवर हिरवा पट्टा असलेली जर्सी घालत होता. त्याच जर्सीमध्ये  ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे.1986 मध्ये वापरण्यात आलेली जर्सी पुन्हा 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ घालणार असल्याने, सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज पीटर सीडलचा या संघामध्ये समावेश केला आहे. सीडल तब्बल आठ वर्षांनी वन डे मालिकेत पुनरागमन करत आहे. 2010 मध्ये सीडलने आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

दरम्यान, या सर्व कारणांमुळे ऑस्ट्रेलिया भारतीय संघावर किती प्रमाणात दबाव आणतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तर भारतीय संघाचा उत्साह अणि आत्मविश्वास तगडा आहे. त्यामुळे भारतीय संघ आता कांगारूंना सिडनीतही धुळ चारेल, असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे.