मनोरंजन

‘या’ चित्रपटात ‘बप्पी लाहिरी’ यांनी गायले ‘पहिले मराठी’ गाणे

मुंबई : वृत्तसंस्था – ८०-९० मधील बॉलिवूडचा काळ आपल्या आवाजाने आणि संगीताने गाजवून टाकणारे  बप्पी लाहिरी यांनी आगामी मराठी सिनेमात गाणे गेले आहे .’लकी’  या चित्रपटातील ‘कोपचा’  हे गाणे त्यांनी गायले असून नुकतेच रिलीज झालेले आहे. निर्मात्यांनी जीतेंद्र-श्रीदेवी स्टारर ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट दिले आहे या गाण्याला अमितराज याने संगीत दिले असून बप्पी लाहिरी आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे. ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांचे हे पहिले मराठी गाणे आहे.
या गाण्याविषयी चित्रपटाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “ माझी पिढी ऐंशीच्या दशकातल्या चित्रपटांवर वाढलीय. आमच्या पिढीचा बप्पीदांच्या गाण्याशी खास ऋणानुबंध आहेच. पण त्यासोबतच जीतेंद्रसरांसाठी माझ्या मनात एक खास जागा आहे. आणि म्हणूनच जीतूसर आणि त्यांच्या गोल्डन एराला समर्पित करणारे कोपचा गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे, हे गाणे रसिकांच्या ओठांवर पटकन रूळेल.”
तसेच या गाण्याविषयी बप्पी लाहिरी म्हणाले, “सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. १९७५ ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर ख-या अर्थाने सुरू झाले. आणि मी ‘लकी’ ठरलो.  मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही.  संजय जाधव यांच्या लकी सिनेमामूळे मी मराठीत गायक म्हणून पदार्पण करतोय.
संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सती स्टारर,  संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट ७ फेब्रुवारी, २०१९ ला रिलीज होणार आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या