ताज्या बातम्या

अवनी वाघिणीच्या शिकारीचा खुलासा : ‘एनटीसीए’चा अहवाल सादर 

नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन – ‘नरभक्षक’ वाघीण अवनी अर्थात टी वन हिला काही दिवसांपूर्वीच शिकार करून ठार मारण्यात आले. अवनीला रात्री उशिरा राळेगांव तालुक्यातील बोराटी गावात ठार करण्यात आलं. अवनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सहा वर्षांच्या वाघिणीने 14 जणांचा जीव घेतल्याचा आरोप होता. तिच्या शिकारीनंतर अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसले. अनेकांनी यावरून टीकीही केली अनेकांनी याला पाठिंबाही दर्शवला होता. परंतु आता नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने अवनी वाघिणीच्या शिकारीबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे आणि यात तिचा शिकार का केली ? तिला बेशुद्ध का नाही केले ? अशा अनेक प्रश्नांचा खुलासा झाला आहे.
 वाघिणीला पकडण्यासाठी आलेल्या टीमने व्हेटरनरी टीमसोबत नीट समन्वय राखला नव्हता 
 हलगर्जीपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे अवनी वाघिणीची शिकार करावी लागली अशी माहिती समोर आली आहे. कारण नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने अवनी वाघिणीच्या शिकारीबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार तसा उल्लेख असल्याचे समजत आहे. ज्या दिवशी अवनी वाघिणीला ठार केले त्या दिवशी यवतमाळच्या जंगलात वाघिणीला पकडण्यासाठी आलेल्या टीमने व्हेटरनरी टीमसोबत नीट समन्वय राखला नव्हता अस या अहवालात म्हटलं आहे.
अवनीला बेशु्द्ध करणे शक्य होते
जेव्हा अवनीला ठार केले त्यानंतर आलेल्या वृत्तांमध्ये असे सांगतिले आहे की, डार्ट म्हणजेच बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन वापरूनही अवनी बेशुद्ध झाली नव्हती तर यानंतर ती जास्तच आक्रमक झाली होती अशी माहिती समोर आली होती. परंतु याबाबतही या अहवालात आता खुलासा झाला आहे. अवनीला बेशुद्ध करण्यासाठी डॉ. कडू यांनी दिलेला डार्ट (बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन) 24 तासांच्या आत वापरणे बंधनकारक होते. परंतु मुखबीर शेख यांनी तो डार्ट तब्बल 56 तासांनी वापरला. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. परिणामी अवनीला ठार मारावे लागले. असा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने (एनटीसीए) दिल्याचे समोर आले आहे.
बेशुद्ध करण्याऱ्या इंजेक्शनचा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापर
दरम्यान व्हेटरनरी टीम आणि अवनीला जेरबंद करण्यासाठी गेलेली टीम यांच्यात समन्वय नव्हता असंही या अहवालात नमूद केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवनीला बेशुद्ध करण्यासाठी दिलेला डार्ट तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरला गेला अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय दोन दिवस उशीराने डार्ट वापरल्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. अवनी या टी1 वाघिणीला ठार केल्यानंतर एनटीसीएने याबाबत अहवाल सादर केला आहे. या अहवालात या सर्व बाबी समोर आल्या आहेत.
अवनीला पकडणे शक्य होते
अवनीाचा शोध सुरू असताना ती अनेकदा दिसलीही होती परंतु तिला मारण्याऐवजी पकडण्यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. परंतु कोणतेही नियोजन केले गेले नव्हते. परिणामी अवनीवर हल्ला करण्यात आला. आणि त्यात अवनीला ठार करण्यात आले. महत्त्वाची बाब अशी की, ज्या टीमने अवनीला ठार केले त्या टीममध्ये डॉक्टर किंवा  बायोलॉजिस्ट असे कुणीही नव्हते असेही एनटीसीए ने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + nineteen =

Back to top button