‘या’ निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा 

मुंबई : वृत्तसंस्था – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मवत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २००६ ते २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. परंतु थकबाकीपोटी शासनाच्या तिजोरीवर २ हजार २०४ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्यात थकित सहावा वेतन आयोगाचा निर्णय निकाली काढणे गरजेचे होते. त्याशिवाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात अडचण येत होती. त्यामुळेच वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

या निर्णयाच्या अंमलबाजावणीने दरवर्षी अतिरिक्त ३१९ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. एकूण १ लाख ११ हजार १४६ सेवानिवृत्तीधारक याचा लाभ मिळणार आहे. तसेच सरकार २ हजार २०४ कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम एकरकमी देणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, वित्त सचिव नितीन गद्रे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.