सभेला परवानगी दिली नाही तरी सभा तिथेच घेऊ : आनंदराज आंबेडकर  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव भीमा वाद पुन्हा उसळणार असं चित्र समोर येतेय  येथील विजयस्तंभास सालाबाद प्रमाणे या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस म्हणजेच १ जानेवारी या दिवशी अभिवादन कार्यक्रमाबद्दल राज्य सरकार गंभीररित्या  विचार करताना दिसत नाही. जर सभेला परवानगी दिली नाही. तरी आम्ही सभा घेणारच असा इशारा देतानाच एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमानिमित्त कोणत्याही उपाय योजना करण्यात येत नाहीत कुठल्याही प्रकारची सुव्यवस्था नाही नियोजन करण्यात येत नाही. सुरक्षिततेसाठी देखील काहीही केलेले नाही, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला  आहे.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, “एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासनाने काहीच  तयारी केलेली नाही. प्रशासनाकडे कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीची मागणी करूनही नियोजन बैठक घेतली जात नाही. गेल्यावर्षी झालेली घटना पुन्हा होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी करायला हवी आहे. मात्र, प्रशासनामध्ये याबाबत गंभीरता नसल्याचे दिसून येते. ”

गेली अनेक वर्ष या ठिकाणी अभिवादन दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम होतात. पण सरकारमधील एक मंत्री म्हणतात, यावर्षी कोणालाही येथे सभा घेऊ दिली जाणार नाही. पण सभेला परवानगी दिली नाही. तरी आम्ही सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी एक जानेवारी ला याच ठिकाणी काही प्रक्षोपक संघटनांनी येथे जातीय तेढ निर्माण करून वातावरणात तणाव निर्माण केला , याचे रूपांतर दंगली मध्ये झाले आणि त्यानंतर राज्यभरात हिंसाचार उमटला त्यामुळे राज्य सरकार आणि सोबतच सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न उभा राहिला या मुळे राज्य शासन इथे सभेला परवानगी नाकारणार असल्याचे चिन्ह दिसून येतेय.

यावेळी आंबेडकर यांनी या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ते म्हणाले, “”कार्यक्रम ठिकाणी स्वच्छ पाणी, वाहन पार्किंगची सुविधा, शिक्रापूर बायपास व खराडी बायपासपासून वाहतूक वळवून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अतिदक्षता विभाग निर्माण करून मेडिकल सुविधा उपलब्ध करण्यात यावी, परिसरातील गावकऱ्यांनी गाव बंद करू नये यासाठी उपाययोजना करणे, परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावीत.”  प्रशासनाने एक जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावी अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली. त्यावेळी प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे,पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण मामा व पुणे शहर संघटक गणेश दादा विटकर व कार्यकर्ते उपस्थिति होते,

कोरेगाव भीमाच्या स्मृती स्तंभाला वंदन करण्याचं काय आहे कारण 

एक जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या सैनिकांना इंग्रजांच्या महार रेजिमेंट सैनिकांनी पराभूत केले होते.  आणि या युद्धामुळे मराठ्यांचे राज्य संपले आणि इंग्रजांची सत्ता कायम झाली होती इंग्रज सरकारच्या वतीने या युद्धाच्या स्मृती जपण्यासाठी कोरेगाव भीमा येथे हा स्मृतीस्तंभ उभारण्यात आला या स्मृती स्तंभाला वंदना करण्याची परंपरा नेमकी कधी सुरु झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्मृती स्तंभाला भेट देऊन आपल्या दलित बांधवांना असपृशयता निवारण्याचे प्रेरणा देणारे भाषण एक जानेवारी १९२७ रोजी दिले होते. त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच स्तंभास विजयस्तंभ देखील म्हणले जाते.