भीमाशंकर : कुंडात बुडून भाविकाचा मृत्यू

भीमाशंकर : पाेलीसनामा ऑनलाईन

उत्तर प्रदेशाहून भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा येथील कुंडात ताेल गेल्या मुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुदयाल अग्रहारी अशी या भावीकाची आेळख असून, ते उत्तर प्रदेश येथून भीमाशंकरला मित्र व भाऊ यांच्याबराेबर दर्शनासाठी आले हाेते.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31865113-881f-11e8-94c0-c1ca3ccdaff5′]

या बाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गुरुदयाल कुंडाजवळ गेले. तितक्यात त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. वरती यायला मार्ग नसल्यामुळे भाऊ आणि मित्राने त्यांना काठी देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गुरुदयाल यांना वाचवण्यास अपयशी ठरले. दाट धुक्यामुळे गुरुदयाल यांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. अखेर दम लागल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. गुरुदयाल अग्रहारी उत्तरप्रदेशहून भाऊ आणि मित्रांसोबत भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले होते. महाराष्ट्रातील तीर्थस्थळांचं दर्शन ते घेत होते. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन काल रात्री साडेअकरा वाजता ते भीमाशंकरला पोहचले. मात्र येथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.