भिमनगर मध्ये दहशत माजवून गाड्या जाळल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिमनगर येथे टोळक्याने नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. हातात हत्यारे घेऊन, नागरिकांच्या दरवाजा आपटून, गाड्या जाळल्या आहेत. हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला असून अद्याप कोणी तक्रार देण्यासाठी आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवीन वर्षाची सुरुवात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहने जाळून झाली. आयुक्तालय सुरू झाल्यानंतर जवळपास वाहनांची तोडफोड, जाळपोळचे प्रकार थंड झाले होते. मात्र सरत्या वर्षाला नववर्षाच्या पहाटे वाहने जाळण्यात आली. पिंपरी, भिमनगर येथे टोळक्याने हातात हत्यारे घेऊन दहशत माजवली. नागरिकांच्या घरावर, दारावर आपटून दंगा केला. तसेच वाहने पेटवून दिली. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी आले नसल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. मात्र दहशत, जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.