बर्थडे स्पेशल : जाणून घ्या विक्रमवीर ‘विराट कोहली’ बद्दल 

बर्थडे स्पेशल : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज वयाच्या तिसाव्या वर्षात पदार्पण करतोय. विराटचा जन्म दिल्ली येथे ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये झाला. यापूर्वी विराटचा सर्व परिवार मध्यप्रदेश येथे कटनीमध्ये राहत होता. तिथून ते स्थलांतर करून दिल्ली येथे आले. विराटला केवळ विराट याच नावाने नव्हे तर चीकू या नावाने देखील ओळखले जाते.
शिक्षण –
मैदानावर चौकार व षटकारांची आतषबाजी करणारा कोहली १२ वी पर्यंतच शिकला आहे. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अभ्यासाकडे पाठ फिरवली आणि क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या तयारीला लागला. कोहलीने दिल्लीच्या विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शाळेत अजूनही त्याचे फोटो लावलेले आहेत.

क्रिकेटवेडा विराट –
कोहलीने लहानपणापासूनच महान फलंदाज सचिन तेंडुलकरसारखा अव्वल फलंदाज होण्याचे मनाशी पक्के केले होते. क्रिकेटप्रती असलेले त्याचे वेड लक्षात घेता वडीलांनी त्याला ९ व्या वर्षी क्रिकेट प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. २००६ साली तो जेव्हा राहुल द्रविडला भेटला त्यावेळी त्याचे डोळे भरून आले होते.
टॅटूचा शौकिन- 

विराट टॅटूचा शौकिन आहे हे त्याच्या शरिरावर असलेल्या टॅटू्जवरून लक्षात येते. त्याच्या शरिरावर ८ पेक्षा अधिक टॅटू त्याने काढले आहेत.

पोटच्या मुलाच्या घरात ‘आई-वडील’ काढत होते पाणी पिऊन दिवस 

विराट शंभर टक्के शाकाहारी –
विराट सतत काहीतरी नवा प्रयोग करुन पाहतो आहे. आता तर वर्षाचे बारा महिने तो श्रावण पाळणार आहे. आपला विराट शंभर टक्के शाकाहारी झाला आहे. विराटने आपल्या आहारातून मांस, मासे आणि अंडी वर्ज्य केली आहेत. इतकंच काय, पण तो दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थही खाण्याचं आवर्जून टाळत आहे. व्हेगन या कडक शाकाहाराच्या अमेरिकी संकल्पनेत दूधही वर्ज्य असतं. कारण ते थेट प्राण्याच्या शरीरातून मिळतं.
विश्वविक्रमी विराट –

यंदाचं वर्ष विराट कोहलीसाठी खासच राहिलेलं आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये विराटने धावांचा अक्षरशः रतीब घातला.

धक्कादायक… टेपचा आवाज वाढविल्याने पोलिसांनी तरूणाला ठार मारले 

या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत. 
१ – भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू 

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराटने ५२ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या होत्या. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावे जमा होता, सेहवागने ६० चेंडूत शतक झळकावलं होतं. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३६० धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं.

२ – कर्णधार म्हणून पहिल्या ३ डावांत ३ शतकं झळकावणारा खेळाडू 
कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतरही विराटची फलंदाजी ही नेहमी बहरलेलीच राहिली आहे. कर्णधार या नात्याने ३ डावांत ३ शतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना विराटने सलग ३ डावांमध्ये ११५, १४१, १४७ अशी शतकी खेळी साकारली होती.
३ – वन-डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाचा खेळाडू

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमधली रंगत सर्वांनाच माहिती आहे. याच पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या नोंदली आहे. ढाक्यामध्ये झालेल्या सामन्यात विराटने १८३ धावांची खेळी केली होती.

बिकट आर्थिकस्थितीला कंटाळून भाजपच्या नगरसेविकेची आत्महत्या

४ – विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना शतक झळकावणारा एकमेव भारतीय खेळाडू
विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. विराटनेही २०११ च्या विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व केलं, यादरम्यान विराटने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने या सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी केली होती.
५  – एकदिवसीय सामन्यात शतकांचा विक्रम 

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतला एक मैलाचा दगड पार केला आहे. त्याने २१६ एकदिवसीय इनिंगमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. विक्रमी खेळी करून ३८ शतके आपल्या नावावर करून घेतली आहेत. असा विक्रम करणार विराट क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज आहे.