अद्याप युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला नाही – रावसाहेब दानवे 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप शिवसेना युतीच्या बाबत अद्याप कसलीच हालचाल केली गेली नाही असे म्हणत अद्याप युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला नाही असे म्हणले आहे. युतीच्या निर्णयाबाबत कोणतीही कार्यमर्यादा नसते मागील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अवघे दोन दिवस अगोदर हि युती तुटली होती त्यामुळे हे प्रस्ताव कधी दिला जाणार अथवा यावर निर्णय कधी होणार हा विषय आत्ताच चर्चेत आणणे योग्य नाही असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे युतीच्या निर्णयाबद्दल काय राजकारण शिजते आहे या बद्दल अंदाज लावण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठवण्यास सुरु केली असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत युतीला तयारच नाही असे शिवसेनेच्या कडून चित्र उभे केले जाते आहे. तर भाजप शिवसेने सोबत युती करून भाजप विरोधात लोकांच्या मनात असेलेल्या विरोधाच्या सौम्य लाटेला विजयाच्या सूत्राला बाधा पोहचवण्या पासून वाचवू पाहते आहे. मात्र युती होणार का या प्रश्नाचे वास्तववादी उत्तर ना भाजपचे नेते देऊ शकतात ना शिवसेनेचे नेते देऊ शकतात.

लोकसभेच्या सर्वच जागा स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असून शिवसेनेने ऐन वेळी युती तोडली तर आपल्याला याचा तोटा होऊ नये याची पुरेपूर खबरदारी भाजपच्या वतीने घेतली जाते आहे. शिवसेनेकडे लवकरात लवकर आम्ही युतीचा प्रस्ताव पाठवणार असून येत्या काळात युतीवर निर्णय घेणार आहे. त्यांच प्रमाणे समविचारी पक्षांशी युती करून आम्ही मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न करणार आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहे. दानवे यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा युतीच्या संदर्भात भाजप सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांचे प्रगती पुस्तक तपासले असून खासदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत अमित शहा यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात कोणत्या अडचणी आहेत तसेच लोकांचा कल कोठे आहे याबद्दल कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.

या बैठकी संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधीने रावसाहेब दानवे यांना विचारले असता त्या बैठकीत आम्हाला २३ प्रकारची कामे पक्षाध्यक्षांनी दिली आहेत. यात बूत स्तरावर कोणत्या प्रकारची कामे केली पाहिजेत इथं पासून ते संघटन मजबूतीची आणि लोकांपर्यंत सरकारचे काम पोहचवण्याची कामे समाविष्ठ आहेत असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. तर राणे-शहा यांच्या गुप्त बैठकी बद्दल रावसाहेब दानवे यांना विचारले असता त्यांनी या बैठकी बद्दल मला कसलीही माहिती नाही असे म्हणले आहे.