तीन राज्यात जिंकले तर काँग्रेस महाआघाडी का करत आहे – भाजप 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाआघाडीतील स्टॅलिन सोडले तर राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यास कोणीच तयार होत नाही. त्याच्या महाआघाडीच्या गुंत्यात सहा जण पंतप्रधान होण्यासाठी उतावळे झालेले आहेत. असा खळबळ जनक टोला भाजपचे काश्मीरमधील प्रवक्ते राम माधव यांनी लावला आहे. जर काँग्रेस तीन राज्यात जिंकून आली आहे तर मग महाआघाडी करण्यासाठी का एवढ्या कस्ता खात आहे असा सवाल हि राम माधव यांनी उपस्थित केला आहे.

राम माधव यांनी राम मंदिराच्या मुद्यावर हि भाष्य करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी राम मंदिराचा अध्यादेश काढण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर त्याची आवश्यकता राहणार नाही असे म्हणले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रश्नाला निकाली काढण्यास उशीर होत असल्याचे म्हणले आहे. ते सर्वोच्च न्यायालय आहे त्या बद्दल आपण काय बोलावे , त्यांनी ४ जानेवारीची तारीख दिली आहे. या दिवशी काय सुनावणी होते हे पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच राम मंदिराचा मुद्दा लोकांच्या भावनेशी जुळलेला मुद्दा असल्याने तो लवकरात लवकर निकाली काढला पाहिजे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेतले पाहिजे असे राम माधव यांनी म्हणले आहे.

राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना महाआघाडीने त्यांच्या हाती महाआघाडीचे नेतृत्व देण्यास नकार दिला आहे. महाआघाडीतील नेत्यांनी या आघाडीत येण्याचे मान्य केले असले तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या बाबत महाआघाडीच्या नेत्यांमध्ये शाशंकता आहे. त्यामुळे महाआघाडीने राहुल गांधी यांना आपला नेता म्हणून जाहीर करावे अशी कोपरखिळी राम माधव यांनी राहुल गांधी आणि महाआघाडीला मारली आहे.  तिहेरी तलाकच्या प्रश्नावर उत्तर देताना राम माधव म्हणाले कि, तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम महिलांनी आम्हाला पाठींबा दिला आहे. तर मुस्लिम समाजाकडून तिहेरी तलाक कायद्याचे स्वागत केले जाते आहे असे राम माधव म्हणाले.