प्रियंका दिल्‍लीत जीन्‍स, तर दौर्‍यावर साडी नेसतात भाजपच्या ‘या’ खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर विरोधी पक्षाकडून वारंवार विविध टीका-टिप्पणी केली जात आहे. आता तर उत्तर प्रदेशचे खासदार हरीश द्विवेदी यांनी प्रियांका गांधी यांच्या पेहरावावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

खासदार हरीश द्विवेदी म्‍हणाले की, ‘प्रियंका दिल्‍लीत असतात तेव्‍हा जीन्‍स आणि टॉप घालतात. त्या जेव्‍हा राजकीय दौर्‍यावर असतात त्‍यावेळी साडी नेसतात आणि कुंकू लावतात. उत्तर प्रदेशमधील बस्‍ती येथे एका कार्यक्रमावेळी खासदार हरीश द्विवेदी यांनी हे वक्‍तव्‍य केले. प्रियंका गांधी यांच्या राजकरणात प्रवेशाबाबत द्विवेदी म्हणाले की माझ्यासाठी किंवा भाजप पक्षासाठी प्रियंका गांधी यांचा मुद्दा येत नाही. तर राहुल गांधी अयशस्वी आहेत त्यामुळे प्रियंका गांधी सुद्धी अयशस्वी होणार.’

‘ही’ अभिनेत्री करणार नगरमधील आंदोलनाचे नेतृत्व
साहेबांच्या उमेदवारीने माझ्या पोटात गोळा : सुप्रिया सुळे
मोदींच्या मतदारसंघापेक्षा माझा मतदारसंघ वरचढ : सुप्रिया सुळे