अयोध्येत मुळस्थानीच राम मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या ठिकाणीच बांधले जाईल या विधानाचा पुनरूच्चार भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते पुण्यात भाजपच्या बुथप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. राम मंदिराच्या मुद्द्यावर शरद पवार आणि काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन हि अमित शहा यांनी केले आहे.

अमित शहा यांनी शिवसेनेवर बोलणे मात्र टाळले आहे त्यामुळे एकार्थी युतीच्या सुरु असलेल्या बोलण्याला दुजोराच दिला गेला आहे. अमित शहा याच्या बूथ प्रमुख मार्गदर्शन शिबिरासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब भेगडे आदी भाजप नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना काँग्रेसवर टीका सुद्धा केली आहे. देशात सध्या मौनीबाबाचे सरकार नाही देशाला सशक्त नेतृत्व देणारे सरकार अस्तित्वात आहे. आमची पार्टी नेत्यांची पार्टी नाही तर कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अनेक निवडणुका आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरच जिंकल्या आहेत असे अमित शहा म्हणाले आहेत. सिंचनाच्या घोटाळ्यात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे सरकार महाराष्ट्रातून हद्दपार झाले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात सत्तेवर आले तेव्हा या सरकारने ६ हजार कोटी रुपयांचे जलयुक्त शिवराचे सिंचनासाठीचे काम केले असे अमित शहा म्हणाले आहेत.