राजकीय

 माझे ‘पुरावे’ खोटे ठरले तर भर चौकात फाशी द्या : धनंजय मुंडे

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – समाज्यातील सर्वच स्तरातील लोक तुमच्यावर नाराज असून, शिशुपालाप्रमाणे तुमचे देखिल 100 अपराध आता भरले आहेत. त्यामुळे तुम्ही युती करा अन्यथा वेगळे लढा तुमचे लवकरच पानीपत होणार आहे, यात काही शंका नाही. अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी युती सरकारवर घणाघाती हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या आजच्या तिस-या दिवशीची पहिली व एकूण पाचवी सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
नव्वद हार कोटींचा घोटाळा राष्ट्रवादीने पुराव्यानिशी बाहेर काढला त्यावर त्याची चौकशी केली जात नाही. उलट मोदी आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात आमच्यावर एकही आरोप नाहीत. त्यामुळे हे देवेंद्र हे फडणवीस नसून ते फसवणीस असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. आपण 16 मंत्र्यांवर केलेला आरोप सिद्ध झाला नाही तर भर चौकात फाशी द्या, त्याचबरोबर पाच दिवस उलटूनही बेस्टचा संप सुरूच आहे. प्रवासासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. काय करतेय पालिका, परिवहन खातं? कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील. प्रसंगी रस्त्यावरही उतरेल असा इशारा देखिल त्यांनी यावेळी बोलतांना दिला आहे.
शिशुपालाप्रमाणे तुमचे देखील 100 अपराध भरले आहेत… 
समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानिपत अटळ आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपा शिवसेनेच्या सरकारवर हल्लाबोल केला. पाच दिवस उलटूनही बेस्टचा संप सुरूच आहे. प्रवासासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. काय करतेय पालिका, परिवहन खातं? कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील. प्रसंगी रस्त्यावरही उतरेल असा इशारा त्यांनी दिला.
लोकांना रेशनवर धान्य मिळत नाही आणि हे ऑनलाईन घरपोच दारू विकायला निघाले आहेत.  जमीन विकून मिळालेला पैसा खिशात राहत नाही, पावडर खाऊन कमावलेली बॉडी कधी टिकत नाही, आणि लाटेत निवडून आलेला आमदार पुन्हा कधी निवडून येत नाही. अशा शब्दात भाजपाच्या लाटेची देखील त्यांनी खिल्ली उडवली.
पुरावे खोटे ठरले तर मी कोणत्याही चौकात फाशी घ्यायला तयार : धनंजय मुंढे  
माझे पुरावे खोटे ठरले तर मी कोणत्याही चौकात फाशी घ्यायला तयार आहे. देसाई यांनी उद्योगाची जमीन राखीव करण्यासाठी 40 हजार कोटी घेतले. 16 मंत्र्यांचा 90 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार पुराव्यानिशी सिद्ध केला. सामाजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये पैसे खाल्ले, आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी लोकांसाठीच्या साहित्यात पैसे खाल्ले. अहो या लोकांनी लहान लेकरांच्या चिक्कीतही पैसे मारले. आणि कसला तुमचा पारदर्शी कारभार? असा सवाल केला.या सोळा जणांची चौकशी लावा. या पैशावर निवडणुका जिंकत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,  माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आदींसह नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या