शेवटी लालबागचा राजाच आला धावून….

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

भक्तांना पावणारा लालबागचा राजा यावेळेस ही आपल्या भक्तासाठी धावून आला आहे. मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विघ्नहर्ताने विघ्न हरुन आपल्या भक्तांचे प्राण वाचवले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, विसर्जनाच्या वेळेस जात असताना एक बोट बुडाली. सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी मोठा अनर्थ टळला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बोटीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेतील अपघात ग्रस्त महिलेसह मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोट उलटण्याची दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलीस आणि फायर ब्रिगेडकडून केला जात आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5069aa3b-bfc3-11e8-b1fe-25046ef5080a’]
गेले दहा दिवसांपासुन लालबागच्या राजाचं विसर्जन मनोभावे पूजा केल्यानंतर राज्यभरातील गणपती बाप्पांचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात, फुलं आणि गुलालाच्या उधळणीत लालबागच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली. काल सकाळी साडेदहा – अकरा वाजण्याच्या दरम्यान निघालेली लालबागच्या राजाची मिरवणूक आज सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. सकाळी 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावू न दिल्याने पोलीसाचे फोडले डोके : पोलीस रक्तबंबाळ 

[amazon_link asins=’B0778JFC13,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’804b3dd8-bfc4-11e8-a65d-ab2ddab2e24e’]