परदेशात चालणाऱ्या सेक्स रॅकेटमध्ये मुलींची विक्री ; बॉलिवूडच्या ‘या’ नृत्यदिग्दर्शिकेला अटक

मुंबई : वृत्तसंस्था-नृत्य शिकण्यासाठी आलेल्या मुलींची परदेशातील वेश्यालयांमध्ये विक्री करणाऱ्या बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेली नृत्यदिग्दर्शिका भारतीय मुलींची नृत्य कार्यक्रमांच्या नावाखील फसवणूक करुन त्यांची विक्री करीत होती. अॅग्नेस हॅमिलटन (वय-५६)असे अटक करण्यात आलेल्या नृत्यदिग्दर्शिकेचे नाव असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले आहे. नुकत्याच एका मुलीची नैरोबी येथे विक्री करण्यात आली होती. मुलीची विक्री करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये नैरोबी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

अॅग्नेसस हॅमिल्टन ही अंधेरी जवळच्या लोखंडवाला परिसरात राहते. याच ठिकाणी ती नृत्याचे वर्ग घेत होती. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत अॅग्नेसचे संबंध होते. पण गेल्या काही वर्षांपासून हॅमिल्टनकडे नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींची बहारीन, केनिया किंवा नैरोबीमधील वेश्यालयांमध्ये विक्री करत होती. एका मुलीमागे तीची ४० हजार रुपये कमवत होती.

काही दिवसांपूर्वी एक गरीब मुलगी तिच्याकडे नृत्य शिकायला आली होती. या मुलीला नृत्याच्या कार्यक्रमासाठी अॅग्नसने केनियाला पाठवले. केनियात रझिया पटेल नावाच्या महिलेशी तिची भेट झाली. रझिया पटेलने तिला केनियातून नैरोबीत नेले. तिथे तिच्याकडून रझिया पटेलने पासपोर्ट काढून घेतला. त्यानंतर नैरोबीच्या एका वेश्यालयात विकलं. ही मुलगी देहविक्रय करण्यास नकार देत होती. तेव्हा ड्रग्स विक्रीच्या खटल्यामध्ये अडकवण्याची धमकीही तिला देण्यात आली.

काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू होता. या हॉटेलवर नैरोबी पोलिसांची धाड पडली. तेव्हा या पीडित मुलीने आपली व्यथा नैरोबी पोलिसांना सांगितली. नैरोबी पोलिसांनी लगेच रझिया पटेलला अटक केली आणि तिच्याकडून पीडित मुलीाच पासपोर्ट मिळवला. पीडित मुलीची ओळख पटल्यानंतर तिला भारतात पाठवण्यात आलं. दरम्यान अपहरण आणि विक्री केल्याप्रकरणी अॅग्नेस हॅमिलटन हिला तिच्या राहत्या घरातून मुंबई पोलिसांनी अटक केली.