बर्थडे स्पेशल : जेव्हा बाॅलिवूडच्या ‘या’ खलनायकाने केले होते ७० व्या वर्षी ४ थे लग्न

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड मध्ये अनेक खलनायक होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. यातीलच एक खलनायक आहे कबीर बेदी. कबीर बेदी यांचा जन्म १६ जानेवारी १९४६ मध्ये पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला. कबीर बेदी यांचे सुरुवातीचे शिक्षण नैनीताल येथील शेरवुड कॉलेज  येथे झाले आणि पदवी शिक्षण दिल्लीच्या  सेंट स्‍टीफंस कॉलेज येथून झाले.  १९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘हलचल’ चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
कबीर बेदी यांचे खाजगी आयुष्य काही वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. जेव्हा त्यांनी वयाच्या ७० वर्षात चौथे लग्न करून सगळ्यांना आश्यर्यचकित केल होते. जेव्हा ७० व्या वर्षी कबीर बेदी यांनी त्यांच्यापेक्षा वयाने ३० वर्ष लहान असलेली इंग्लंड येथे राहणारी परवीन दोसांझ हिच्यासोबत लग्न केले होते.

कबीर बेदी यांनी १९६९मध्ये पाहिले लग्न ओडिसा डान्सर प्रोतिमा बेदी यांच्या सोबत केले. अभिनेत्री पूजा बेदी ही  कबीर आणि प्रोतिमा यांचीच मुलगी आहे. या दोघांना  एक मुलगाही होता,परंतु त्याने आजाराला कंटाळून १९९७ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी आत्महत्या केली. १९७४मध्ये कबीर आणि प्रोतिमा वेगळे झाले. याचे कारण होते परवीन बाबी आणि कबीर बेदी यांचे नाते.
यानंतर कबीर बेदी यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हंफ्रीज (Susan Humphreys) हिच्याशी लग्न केले. हे लग्नही जास्त काळ राहिले नाही दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना एडम नावाचा मुलगाही आहे.
१९९० मध्ये त्यांनी टीवी आणि रेडियो प्रेझेंटर निक्की बेदी हिच्याशी लग्न केले. आणि दुसऱ्या लग्नाप्रमाणे हे नातं जास्त काळ राहिले नाही  २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
हलचल चित्रपटातून अभिनयाला सुरवात केलेल्या कबीर बेदी यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला आहे.’खून भरी मांग’, ‘कच्चे धागे’, ‘मां बहन और बीवी’, ‘नागिन’, ‘डाकू’, ‘अशांति’,’पुलिस पब्लिक’, ‘कुर्बान’, ‘दिल आशना है’, ‘यलगार’, ‘दिलवाले’, ‘मोहनजोदाड़ो’ यांसारख्या  चित्रपटात ते दिसून आले होते. तसेच १९८३ मध्ये जेम्स बॉण्ड यांच्या ‘ऑक्टॉपसी’चित्रपटातही दिसून आले होते.