याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सलेक्ट मोबाइल कंपनीचे शहरात औरंगपुरा आणि कनॉट प्लेस या ठिकाणी शोरूम उघडले आहे. या कार्यक्रमाची परवानगी शोरूमचे व्यवस्थापक शकील शेख यांनी सिडको पोलिसांकडून घेतली होती. या कार्यक्रमाला अंदाजे साडेतीनशे ते चारशे लोक येतील म्हणून सिडको पोलिसांनीही त्वरित परवानगी दिली.पण झरीन खान आल्यावर दोन ते अडीच हजार प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यातील काही प्रेक्षकांनी झरीन खान शो रुम मधे जात असतांना सही घेण्यासाठी बाऊन्सरचे कडे तोडून जाण्याचा प्रयत्न केला.
ज्यानंतर बाऊन्सर ने प्रेक्षकांना मज्जाव करताच बाउन्सरवर काही तरुणांनी शिवीगाळ करत हल्ला चढवला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यामुळे संतापलेल्या बाऊन्सरने प्रेक्षकातील तरुणांना मारताच तरुणांच्या टोळक्याने आणखी साथीदारांना लाठ्या काठ्या घेऊन बोलावले.पण त्याच वेळेस सिडको पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी आले व प्रकरण शांत झाले.