गिनीज बुकात नोंद असलेल्या ‘या’ विनोदी अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या विनोदी शैलीने सर्वाना खळखळून हसवणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटाचे प्रसिद्ध विनोदी कलाकार ब्रम्हानंदम (६२) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. सध्या त्यांना मुंबईच्या एशियन हार्ट इंस्टीट्यूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ब्रम्हानंदम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉ. रमाकांत पांडा यांनी त्यांची हार्ट सर्जरी केल्याची माहिती मिळते आहे.

गिनीज बुकात नोंद
ब्रम्हानंदम यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. एकाच भाषेत ७०० पेक्षा जास्त चित्रपट केल्यामुळे २००७ मध्ये त्यांच्या नावे हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला होता. या अभिनेत्याने ३ दशकांच्या दिर्घ करिअरमध्ये 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ब्रम्हानंदम एका चित्रपटाचे जवळपास १ कोटी रुपये चार्ज करतात.

असा मिळाला होता पहिला ब्रेक
ब्रम्हानंदम आपल्या आई-वडिलांचे ७ वे आपत्य आहेत. ते आठ भावंड आहेत. ब्रम्हानंदम सांगतात की, देवाच्या कृपेने मी बालपणापासून लोकांना हसवण्यात यशस्वी राहिलो आहे. माझे खुप चांगले मित्र एमसीव्ही शशिधर हे डीडी-८ मध्ये चीफ प्रोग्रामिंग ऑफिसर होते, ते मला प्रसिध्द लेखक विष्णु यांच्या घरी घेऊन गेले. ते म्हणाले की, मी खुप चांगली स्टँडअप कॉमेडी करु शकतो, ही कॉमेडी टीव्हीवर ऑनएयर जाऊ शकते. यानंतर मला जन्ध्याला यांनी पाहिले आणि अशाप्रकारे मला १९८५ मध्ये ‘चन्ताबाबाई’ मधून पहिला ब्रेक मिळाला.