मसाज करून घेताना विदेशी पर्यटक महिलेवर केला अत्याचार 

चंदीगड : पंजाब वृत्तसंस्था – माणसाची विकृती कोणत्या थराला जाईल हे काय सांगता येत नाही. वाचून अथवा ऐकून आपणाला संताप येईल अशीच एक संतापजनक घटना  चंदीगडमध्ये  घडली आहे. येथे आलेल्या विदेशी महिलेवर मसाज करून घेताना लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  चंदीगड येथे पर्यटक म्हणून आलेल्या महिलेवर मसाज सेंटर वरील मसाज बॉयने लैंगिक अत्याचार केला असून या महिलेचे वय साधारता ५० वर्ष आहे.

इंग्लंडचे नागरिकत्व असलेल्या या महिलेच्या तक्रारी नंतर चंदीगड पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात फिर्याद  दाखल केला आहे. १९ डिसेंबर रोजी चंदीगड येथे हि महिला पर्यटक आली होते. ती त्याच्या पार्टनर बरोबर चंदीगड येथील हॉटेल मध्ये राहत होती. मसाज करून घेण्याच्या उद्देशाने हि महिला एकटीच मसाज सेंटर वर गेली असता तिच्यावर मसाज करते वेळी लैंगिक अत्याचार केला गेला.  त्या  इंग्लंडच्या महिलाने लैंगिक अत्याचार  केल्याचा आरोप केल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. लैंगिक अत्याचार झालेली महिला  ५० वर्षाची असून तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे.

चंदीगड पोलिस आता या प्रकरणाची  कसून चौकशी करत आहेत. चौकशीच्या प्रथम अहवाला नुसार आरोपीचे वय  २८ वर्षे आहे. पोलिसांनी सांगितले की, ती महिला तिच्या जोडीदारा सह पर्यटक व्हिसावर भारतात आली होती. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपी परवानगी शिवाय तिच्या शरीराच्या गुप्तभागाला स्पर्श करू लागला त्यानंतर मी त्याला विरोध केला तर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. आपला जोडीदार तेव्हा आपल्या सोबत नव्हता तो कोठे तरी बाहेर गेला होता. म्हणून मी एकटीच मसाज सेंटरवर मसाज करण्यासाठी गेले असता माझ्या सोबत असे दुष्ट कृत्य झाले आहे असे या महिलेने म्हणले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले – “या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आरोपींवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. त्याला आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. हि विदेशी महिला आपल्या साथीदारा सोबत ज्या हॉटेल मध्ये राहिली होती ते हॉटेल चेन चंदीगडच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्क परिसरात आहे. विदेशी पर्यटक महिलानांवर होणारे अत्याचार हि भारताच्या अथिती देवो भव: या संकल्पनेला काळीबा फासणारी बाब आहे. मागील काही दिवसा पूर्वी गोव्याच्या कोणकोणी रेल्वे स्थानका जवळ अशाच एका विदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार झाला होता. अशा घटनामुळे देशाचा लौकिक धुळीला मिळत चालला आहे.